Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीसह विवाहितेचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना पाड्व्याच्या दिवशी भर रस्त्यावर एका २१ वर्षीय योगा शिक्षिका असलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २१ वर्षीय योगा शिक्षिका दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंप्राळा उड्डाणपूलनजीक ब्युटी पार्लरची ओर्डर करण्यासाठी जात असतांना संशयित आरोपीने तिच्या जवळ येत मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिचा हात पकडला, यासह तिच्याशी चुकीचे वर्तन केल्याने तरुणीला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिलेवर नियमित उपचार सुरु होते. येथील वार्ड बॉयने त्या महिलेचा रुग्णालयात विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका खाजगी रुग्णालयात एक २६ वर्षीय महिला नियमित उपचारासाठी आली असता रुग्णालयात डॉक्टर नसताना एका वार्ड बॉयने त्या महिलेला कुठल्याही उपचाराची गरज नसताना तिला जनरल वार्डमध्ये घेवून जात दि. १४ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजे दरम्यान चुकीचे कृत्य केल्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात एका वार्ड बॉय विरोधात विनयभंग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील शेत शिवारात अनोळखी चोरट्यांनी दरोडा टाकत या शेताची राखण करणाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळगाव – पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात काही अनोळखी चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत शेताची राखण करणाऱ्या ५२ वर्षीय इसमाचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घृण खून केला आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले आहे. बिलवाडी येथील रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी ते शेताची राखण करण्यासाठी पांडुरंग…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीची लगबग राज्यभर सुरु असतांना तळवडे-म्हाळाईवाडी येथे एअरगनने फायर केलेला छर्रा पाठीत लागून मोहन भिवा मालवणकर (वय ५२) हे जखमी झाल्याचा प्रकार रविवारी दि. १२ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेजारील अंकुश सीताराम लोके (वय २४) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री.मालवणकर हे घराकडे चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळल्याचे जाणवले. या वेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी अंकुश लोके याच्यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्ती धावत आल्या. अंकुश लोके याच्या हातात या वेळी एअरगन होती. त्याने मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत खालील भागास…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील शेतात ऐनपूर येथील 30 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. निंभोरा पोलिसांना खुनाची माहिती कळताच त्यांनी धाव घेत तपासाला वेग दिला आहे. शेख अफजल शेख असलम (30, ऐनपूर, ता. रावेर) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख अफजल या तरुणाचा मृतदेह निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील एका शेतात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सापडला. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या तरुणाचा नेमका खुन कुणी व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती कळू शकली नाही. डोक्यात दगड वा धारदार शस्त्र मारल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तर शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार समोर येणार आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव एसीबीने कारवाईचे फटाके फोडत जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला पाच लाखांची लाच घेताना अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी पाडव्याची शासकीय सुटी असताना लाचखोर महाभाग पंचायत समिती कार्यालयात आले व लाच स्वीकारताच एसीबीने काम फत्ते केले. विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (53) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था नेहमीच अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या अरुणा शेजारील झुडपात हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली. पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठय कारणावरून नेहमीच वाद निर्माण होत असतो पण तो वाद टोकाला कधी जाईल हे मात्र सांगता येत नसते. अशीच एक घटना धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे. दुकानदाराला मला उधारीवर सामान देऊ नको असे का सांगितले, याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून हा प्रकार सोमवारी दि.१३ रात्री बाराच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी सोसायटीमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील बैजु लक्ष्मी मंडल (वय-३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील पद्मालय रेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीला काहीही कारण नसताना एकाने लोखंडी आसारीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील नंदकिशोर उत्तम पाटील (वय ५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून बिगारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नंदकिशोर पाटील हे बिगारी काम करण्यासाठी ठेकेदारासह पद्मालय रेस्ट हाऊस येथे जमा झाले होते. दरम्यान पद्मालय रेस्ट हाऊसच्या गेट समोर बसलेले असताना पंकज नथू पवार यांच्या चहाच्या टपरीजवळ पप्पू नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे नंदकिशोर पाटील यांनी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तरप्रदेशात एक भयानक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुझफ्फरनगर परिसरात घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की सहाही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिवम त्यागी, परश शर्मा,…

Read More