Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उर्फी जावेद पोलीस स्थानकात हजर !
    क्राईम

    उर्फी जावेद पोलीस स्थानकात हजर !

    editor deskBy editor deskNovember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही वर्षापासून आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद नेहमी अनेक वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकत असते. सध्या उर्फी जावेद अडचणीत आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदचा पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता उर्फी जावेदने आज ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे.

    प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्यासाठी उर्फी जावेद काहीही करत असते. नवनवीन फंडा ती वापरत असते. पण आता उर्फीला प्रसिद्धीसाठी वापरलेला फंडाच भारी पडला आहे. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडवाला बॅक रोड परिसरात बनावट पोलिसांच्या सहाय्याने अटक करण्याचा एक व्हिडिओ तयार केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

    उर्फीने हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. हे कृत्य करणं उर्फीला महागात पडले. याप्रकरणी तिच्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर उर्फी दुबईला गेली होती. मात्र अखेर आज सकाळीच ऊर्फी जावेद मुंबईत दाखल झाली. त्यानंतर ती थेट ओशिवरा पोलिस ठाण्यात पोहोचली. यानंतर ओशिवरा पोलीसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.