Author: editor desk

वाशीम : वृत्तसंस्था राज्यभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना वाशिम शहरातून एक क्लिनिकला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिकला लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नसल्याचे घटनास्थळावरुन सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांचे क्लिनिक आहे. या क्लिनिकला रात्री बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीची माहिती वाशिम नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग पूर्णपणे विझविली. या आगीत क्लिनिक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षापासून मोठी गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच एका भाजपचे पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची एका हत्या केलायची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) या दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करत होते. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी राजू डेंगरे यांच्याशी पैशांची मागणी केली. गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडून प्रत्येकी ६…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ रेल्वेमधील प्रवासादरम्यान झालेल्या छोट्या मोठय भांडणाचे व्हायरल होत असतांना नुकतीच एक घटना छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रेनमधील समोर आलीय. ट्रेन लातूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आली असता खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीसोबत वडापाववरून वाद झाला. मात्र, हा वाद त्या प्रवाशाला चांगलाच महागात पडला. त्या प्रवाशाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालाजी दिगंबर जानोळे असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. बालाजी दिगंबर जानोळे हे आपली पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादला जाण्यासाठी ट्रेनमध्ये…

Read More

बारामती : वृत्तसंस्था राज्यभर गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या तरुणाचे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. चंद्रकांत वाघमोडे या युवकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांकडून बारामती बंदची हाक देण्यात आली. या बंदला बारामतीत उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून नेहमीच बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग असो कि राष्ट्रीय महामार्ग क्र.६ असो नेहमीच  काही ना काही छोट्या मोठ्या अपघातामुळे हे दोन महामार्ग चर्चेत येत असतांना भाऊबिजेच्या दिवशी देखील अशीच एक भयानक अपघात मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुण तर कल्याण येथील एक तरुण ठार झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील वसंतवाडी येथे स्व भागचंद चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्तुत्य उप्रकम जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील माजी सरपंच स्व.भागचंद चव्हाण यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर चव्हाण जळगाव तालुका शिवसेना समन्वयक यांनी वसंतवाडी वार्ड क्रमांक ३ तांडा येथील नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्ड व डिजीटल रेशनकार्डचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमाला जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, वसंतवाडी माजी उपसरपंच गजमल पवार, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर सोनार ,वि.का.सोसायटी संचालक शांताराम राखुंडे जेष्ठ नागरिक बळीराम चव्हाण, रामदास चव्हाण,झामु चव्हाण प्रल्हाद चव्हाण , चंद्रदास चव्हाण,विलास चव्हाण शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण , मोहन चव्हाण,आशा सेविका गोजर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महीला…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील तरुणाने तब्बल ७ दिवसापासून एका २८ वर्षीय तरुणीला सतत फोन करून माझ्याशी लग्न कर म्हणत विनयभंग केल्याने रावेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली २८ वर्षीय तरुणीला दि.७ नोव्हेबर ते दि.१४ नोव्हेबर दरम्यान त्याच गावातील एक तरुण सतत फोन करून माझ्याशी लग्न कर नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल व तुला व तुझ्या घरच्यांना खोट्या गुन्ह्यात फसवेल अशी धमकी देखील या तरुणाने दिली तरुणीने लागलीच रावेर पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार…

Read More

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील आसेर परिसरात बुधवारी बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस रोडवरुन घसरुन ही बस खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बाटोटे किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरुन बस ( क्रमांक JK02, CN 6555 ) ही तृंगाल आसार परिसरातून जात होती. यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोडा जिल्ह्यात झालेल्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या घरात काम करणाऱ्या नोकरावर बळजबरीनं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. नोकराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यावर स्वरक्षणासाठी महिलेने चाकूने नोकराचा प्रायव्हेट पार्ट कापला. ज्यामुळे नोकर गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या नोकराची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना चादर आणि उशी रक्ताने माखलेली दिसली. पोलिसांनी चाकू जप्त…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ (वय ३५) असं पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते, अशी माहिती मिळत आहे. सोलापूर शहर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय…

Read More