Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ५०० मीटर दरीत कोसळली जीप : ७ जणांचा मृत्यू
    क्राईम

    ५०० मीटर दरीत कोसळली जीप : ७ जणांचा मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक राज्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच उत्तराखंडमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. नैनीताल जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक जीप ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते तसेच चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

    अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातात झालेल्या गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. येथील रस्ता खराब असल्याने वाहन नियंत्रण सुटून खोल खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सध्या घटनास्थळी लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.