Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पेपरच्या शेवटच्या दिवशी प्रपोज अन गुंगीचे औषध देवून अत्याचार !
    क्राईम

    पेपरच्या शेवटच्या दिवशी प्रपोज अन गुंगीचे औषध देवून अत्याचार !

    editor deskBy editor deskNovember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील कडा येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, एप्रिल २०१८ मध्ये वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अखेर पीडितेच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर, २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी गावातील एका तरुणाने प्रपोज केल्यानंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही दिवसांनी ती शेतात जाताना फोन कर, नसता मी घरी येईन, अशी धमकीवजा मोबाइल नंबर लिहिलेली चिठ्ठी देत, तिला घरी बोलावून गुंगीचे औषध देत, एप्रिल २०१८ साली अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. परंतु भीतिपोटी मुलगी काहीच बोलली नाही.

    मागील वर्षी मुलीचे लग्न झाल्यावर सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून हा तरुण तिला व तिच्या नवऱ्याला मेसेज करू लागल्याने, त्याच्यावर महिलेच्या पतीने जानेवारी, २०२३ मध्ये अहमदनगर पोलिसांत माहिती व तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. पतीने तिला जाब विचारल्यावर ती घाबरून गेली होती. अखेर २१ वर्षीय पीडितेने सोमवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी सागर शहदेव रक्ताटे याच्याविरुद्ध अत्याचार, अनुसूचित जाती जमाती, पॉक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी फरार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाच प्रकरणात ‘माझी लिंक सापडली, तर राजीनामा निश्चित’ – झिरवाळांचा स्पष्ट इशारा

    February 13, 2026

    ‘अजित पवार लहान भावासारखे’; नाना पाटेकरांची भावनिक आठवण !

    February 13, 2026

    ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारीचा आरोप; सदाभाऊ खोतांची जयंत पाटील यांच्यावर टीका

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.