Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमाचे नाटक : दोन वर्ष तरुणीवर अत्याचार अन गर्भवती !
    क्राईम

    प्रेमाचे नाटक : दोन वर्ष तरुणीवर अत्याचार अन गर्भवती !

    editor deskBy editor deskNovember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक तरुणीवर अत्याचार व विनयभंग होत असल्याच्या घटना घडत आहे तर पोलीस विभाग यातील आरोपींना धरपकड करीत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने दोन वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्भपातानंतर संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी संशयित आरोपी संदेश राजेंद्र कुलकर्णी (२३ रा.अंबड) याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भारतनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे मित्र मैत्रीण असून २०२१ मध्ये संशयिताने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. यावेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेच्या घरी तसेच सिडकोतील हॉटेल चंद्रलोक आणि इंदिरानगर येथील हॉटेल असोशिया सयाजी येथे घेवून जात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार सलग दोन वर्ष सुरू राहिल्याने युवती गर्भवती राहिली असता संशयिताने बळजबरीने तिचा गर्भपात केला. त्यानंतर पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.