अकोला : मनीष खर्चे राज्यातील अनेक जिल्ह्यातून नेहमीच गोवंश चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना यावर आता अकोला जिल्हयामध्ये गोवंश चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, संदिप घुगे अकोला यांनी स्थानिक गुच्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक, शंकर शेळके यांना मार्गदर्शक सुचना देवुन जिल्हयातील गोवंश वोटरीये गुन्हें उपहकिस आणण्याबाबत सुचना दिल्या त्यावरून आज दिनांक ०६.१२.२०२३ रोजी गोपनिय माहिती मिळाली कि, वाशिम बायपास परीसरातील हुसैनी शॉप च्या पाठीमागे एका पांढ-या रंगाच्या टाटा व्हिस्टा एम एच २०, डी एप्फ ०३११ या वाहनामध्ये पातुर परीसरातुन गोवंश चोरीकरून येत आहे. अशा माहिती वरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचुन कार्यवाही केली असता तेथे एक…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आल्याने लोहार यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी फिर्याद दिली आहे. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (५०), पत्नी सुजाता किरण लोहार (४४), मुलगा निखिल किरण लोहार (२५, रा. प्लॉट नं. सी. २, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोहार यांनी परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथील बसस्थानकाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाळधी येथील दोन तरुण जखमी झाल्याची घटना आज दि.६ डिसेंबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोन तरुण दुचाकी (एमएच – १९ डिओ- ०६८२) ने जात असताना त्यांच्या दुचाकीला जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कार (एमएच १९, जे – ०८५०) ने जबर धडक दिली. ही घटना वराड येथील बसस्थानकासमोर घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघे १० ते १२ फूट घसरत गेले असून जखमी झाले आहेत. हा अपघात होताच ग्रामस्थांनी दुचाकीस्वारांना मदत केली. त्यानंतर पोलिस पाटील राजू वाढले, हेड कॉन्स्टेबल सुरवाडे, संदीप पाटील, नीलेश सुरेश भील, बालू नाईक, उमेश बळीराम…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाटरोडवरील छाजेड ओईल मिलजवळील कॉम्प्लेक्समधील भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे ७ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना काही लोक झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचे खेळावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, पोना. तुकाराम चव्हाण, पोकॉ. विनोद खैरनार, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, नंदकिशोर महाजन, मोहन सूर्यवंशी यांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. त्यात जुगार खेळताना…
धुळे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडत असतांना अशीच घटना धुळे शहरातून समोर आली आहे. एका ४ वर्षीय भाच्याची एका मामाने हत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला घराबाहेर अंगणात खेळत होता. मात्र, काही वेळेनंतर घरातील सदस्यांना दिसलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी चिमुकला बाहेर कुठेही सापडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी शेजारीच असलेल्या बाथरूममध्ये पाहणी केली. त्यावेळी या चिमुकल्याच्या मामा त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून शेजारी बसल्याचा आढळून आला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी चिमुकल्यास मृत घोषित केले. हि…
पुणे : वृत्तसंस्था चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील एका परिसरात घडली आहे. हडपसर भागातील औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत ही घटना घडलीये. मोतीलाल साहू असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोतीलालचे मामा शंकरदिन यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरदिन आणि आरोपी धीरजसिंग हडपसर औद्योगिक वसाहतीतील पूना फ्लोअर अँड फूड्स कंपनीत काम करतात. दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल कामासाठी मामा शंकरदिनकडे आला होता. मोतीलाल आणि धीरजसिंग यांची मैत्री झाली. कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी धीरजसिंग काम करीत होता.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलाव परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या इतर ३ अशा एकूण ४ दुचाकी हस्तगत केले आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरातील सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार…
रावेर : प्रतिनिधी छातीत दुखू लागल्याने अटवाडे येथील वृद्धेला खासगी डॉक्टराकडे नेत असतना अटवाडे-रावेर बसमध्ये मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव केशरबाई मधुकर कोळी (६५) असे आहे. अजनाड येथील मधुकर निंबा कोळी (७१) यांच्या पत्नी केशरबाई कोळी त्यांना छातीत दुखू लागले. खानापूर येथे खासगी डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी आले असता त्यांना डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. रावेरला घेऊन जाण्यासाठी अटवाडे रावेर बसमध्ये बसले. भोकरीजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालक व्ही. वाय. ढेकळे व वाहक ए. एस. तडवी यांनी प्रवाशांना उतरवून वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे यांना सोबत घेऊन बस थेट रावेर ग्रामीण रूग्णालयात नेली. वैद्यकीय…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या समाधान लक्ष्मण सुरासे (वय २३, रा. बेटावद, ता. जामनेर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयाने दि. ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही मुलगी व समाधान लक्ष्मण सुरासे हे दि. ४ डिसेंबर रोजी सुरत येथे सापडले. मुलीने जबाब दिला की, सुरत दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले असून याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कलम वाढविण्यात आले. त्याला ५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश…
मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र मंगळवारी ५ डिसेंबर एकाच दिवसात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ६३ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावातदेखील दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती ७६ हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. गेल्या आठवड्यापासून सोने- चांदीचे भाव सतत वाढत असून सोमवारी सोने ६४ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर तर चांदीदेखील ७८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिणामामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात…

