Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : आधी विनयभंगाचा गुन्हा नंतर प्रौधाने संपविले जीवन !
    क्राईम

    खळबळजनक : आधी विनयभंगाचा गुन्हा नंतर प्रौधाने संपविले जीवन !

    editor deskBy editor deskNovember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावातील शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र तोच त्याच बातमीचे पडसाद असे काही उमटले कि, दुपारी त्या संबंधित गुन्ह्यातील आरोपीने आपली जीवन यात्राच संपवल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप असलेल्या आरोपीने शिरसोली ते दापोरा रेल्वेरुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडधाने (५३) यांच्या विरुद्ध २० वर्षीय विद्यार्थिनीने दि. २६ ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याची फिर्याद रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी ३१ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर कडधाने यांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला संबंधित घटने बाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता, सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून पोलीस तपास करीत होते. मात्र मृतदेहाची ओळख पटताच नातेवाईकांना सदर माहिती देण्यात आली. मयत कैलास कडधाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.