अमळनेर : प्रतिनिधी मोटरसायकलने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने पिळोदा येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ४ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली. याप्रकारणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) व त्यांच्या पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे मोटरसायकलवर पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई यांचा श्वास सुरू असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या…
Author: editor desk
धुळे : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर दारू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली असतांना यावर आता कारवाई झाली आहे. मध्यप्रदेशकडून शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अवैधपणे वाहतूक होत असलेल्या दारू साठ्यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई करत दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशकडून अवैधपणे वाहतूक करत मोठ्या प्रमाणात दारू साठा भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी बोराडी परिसरामध्ये सापळा रचला असता त्या ठिकाणी संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला. ट्रक चालकाने पोलिसांना दुरूनच बघून ट्रक सोडून धुम ठोकली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये…
अकोला : वृत्तसंस्था विवाहित मुलीने प्रेमसंबंध ठेवले होते आणि तिला सतत सांगितल्यानंतरही ती ऐकत नसल्याने समाजात बेअब्रू होईल, त्यामुळे भावाने व काकानेच कट रचून तिची हत्या केल्याचे अकोट फैल पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात काका व मृत विवाहितेचा भाऊ दोघेही पोलिस कोठडीत आहेत. अकोट फैलातील झाडीपुरा साधना चौकात २४ नोव्हेंबरला एका २१ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर विवाहितेचा भाऊ शेख इमरान शेख अशफाक कुरेशी (वय २५) व काका शेख मुश्ताक शेख बिस्मिल्ला कुरेशी (४१) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्यादाखविताच, त्यांनी गुन्हा कबूल केला महिलेचे अकोट फैल येथील एक युवकासोबत प्रेमसंबंध…
जळगाव : प्रतिनिधी पुणे असलेल्या मुलाकडे गेलेल्या अनिल पंडित कुरकुरे (रा. भिकमचंद नगर) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगर औष्णिक केंद्रातून निवृत्त झालेले अनिल कुरकुरे यांचे शहरातील भिकमचंद जैन नगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा सागर कुरकुरे हे पुणे येथे नोकरीला आहे. त्यामुळे दि. ३० नोव्हेंबर रोजी कुरकुरे दाम्पत्य पुणे येथे मुलाकडे गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंदच असल्याने चोरट्यांनी हीच संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गांधली रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकली. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सप्तशृंगी मंदिराजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (६२) व त्यांच्या पत्नी मंगलबाई युवराज पाटील (५५) हे मोटारसायकलवर पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर मंगलबाई गंभीर जखमी आहेत. तातडीने नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिले. शवविच्छेदनसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. हे.कॉ. सुनील पाटील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करीत असलेल्या व्यक्तीवर नेहमीच पोलीस प्रशासन कारवाई करीत असते. अशीच एक कारवाई नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले, असून त्यांच्याकडून 3 लाख 66 हजार 960 रुपये किंमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एपीएमसी पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी एपीएमसी परिसरातून अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे, आरोपी मंजू फारूक वय 30 वर्षे रशिदा शेख वय 37 वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईत गांजा गुटका प्रकरणी अनेकदा महिला आरोपींना…
पैठण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी शेतात जाऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना तेलवाडी (ता.पैठण) येथे शनिवारी (दि. २) रोजी घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय मच्छिन्द्र मोहिते (वय २७), विलास विनायक मुळे (वय २३) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तेलवाडी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिला ‘तू मला खूप आवडते’ असे सांगून मळ्यात नेत बलात्कार केला. यानंतर दुसरा आरोपी विलास मुळे तरुणाने मुलीची आई व भाऊ पैठणला गेल्याचे पाहून तिच्या घरी गेला व मित्र मोहिते याच्या मळ्यातून…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आज देखील जादूटोण्याच्या घटना घडत आहेत अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडला आहे. पैशाचा पाऊस पडतो म्हणून एका भोंदूबाबाने युवकाचे 18 लाख रुपये पळवले आहेत. हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात पैशाचा पाऊस पडण्याच्या धक्कादायक प्रकाराची नाेंद पाेलीसांत झाली आहे. पाेलीस घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत. मिळालेल्य माहितीनुसार, कोट्यावधी रुपयांच्या पैशाचे पाऊस पडतो असे सांगत युवकाचे 18 लाख रुपये पळवणारा बाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चार जणांवर हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद छोटेलाल परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पैशाचा पाऊस पडतो असे सांगून…
मुंबई : वृत्तसंस्था देशात मिचाँग चक्रीवादळामुळे राज्यांत पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशासह राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने देशातील तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठं नुकसान…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात हॉटेलचा वापर वेश्या व्यवसायासाठी करणा-या दोन जणाविरोधात एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरातील हॉटेलमध्ये अचानक दि. ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी छापेमारी केली असता याठिकाणी पश्चिम बंगाल येथील २० वयोगटातील पाच तरुणी या हॉटेल वजा लॉजमधे आढळून आल्या. या प्रकरणी सचिन सुरेश साळुंके (वय ३५ वर्ष, व्यवसाय नोकरी, नेम- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला संशयित आरोपी सागर नारायण सोनवणे (लॉज मालक) व शाम विश्वास बोरसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.

