पुणे : वृत्तसंस्था मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेले तर तुम्ही हातात बंदुका घेऊन केवळ बघ्याची भूमिका घेणार आहात का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घरात वायरिंगचे काम करतांना विजेचा शॉक लागून प्रौढ जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे विजय वसंत वाघ हे वास्ताव्यास आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास विजय वाघ हे त्यांच्या घरात वायरिंगचे काम करीत होते. त्यांना विजेचा धक्का लागल्याने विजय वसंत वाघ (४५, रा. मोहाडी, ता. जळगाव) हे जखमी झाले. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील शिवरे येथील २९ शेतमजुरांना शेतातील अशुद्ध पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली. तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर चेतन पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. या मजुरांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, यातील एक वर्षाच्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने पुढील – उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे. शिवरे येथील शेत शिवारात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील पानसेमल येथील शेतमजूर कामासाठी आलेआहेत. शेतात काम करीत असताना एका मोठ्या ड्रममध्ये असलेले दूषित पाणी ते पिल्यामुळे त्यांना मळमळ होऊ लागली तर काहींना वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चेतन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून…
जळगाव : प्रतिनिधी मालवाहून रिक्षा घेवून जात असलेल्या रिक्षा चालकाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मारहाण केली. त्यानंतर रिक्षा चालकाच्या खिशातील रोकड आणि महत्वाचे कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेत पहून गेले. ही घटना शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाल एकनाथ शिंदे यांच्याकडे मालवाहू रिक्षा आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गोपाल शिंदे हे एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कंपनीच्या गेटसमोरुन जात होते. यावेळी दुचाकीवरुन दोन तरुण त्यांच्याकडे आले. त्यांनी रिक्षा चालक शिंदे पकडून खाली उतरविले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशातून…
अमळनेर : प्रतिनिधी भावाला मारून टाकण्याच्या धमक्या देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमळनेर शहरात घडली. या आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असे. ही मुलगी क्लाससाठी जात असताना ‘फोन करत जा; नाहीतर तुझ्या लहान भावाला मारून टाकीन’, अशी धमकी देत असे. दि. ७ डिसेंबर रोजी त्याने भावाच्या मोबाइलवर फोन करून ‘मला भेटायला ये’, असे सांगितले. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्याने त्या दोघांनी तडक पोलिस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जामनेर : प्रतिनिधी शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा फरार आहे. तर आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले. आरोपीचा मुलगा आणि…
पुणे : वृत्तसंस्था सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभरातील महिला व पुरुष एकाच ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारी घटना देखील यातून घडत आहे. नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवून एका महिलेचा विनयभंग केला. तर महिलेच्या मैत्रिणीला अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत पीडित महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याबाबत कर्वेनगर येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश सुनिल शहाणे (रा. साततोटी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आता पुणे शहरात देखील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना अशीच एक घटना विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कॅफेमध्ये कॉफी पित असताना महिलेचा हात पकडून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील कॅफे कॉफी पिक येथे शुक्रवारी (दि.8) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 36 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ध्रुव सक्सेना (वय-२७) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागातील रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार केले जाणार आहे. यात जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते जोडणी अंतर्गत हा निधी मिळाला आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही दळणवळणासाठी फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी ११ कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणारे प्रमुख जिल्हामार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता ३४ कोटी निधीचा समावेश करण्यात आला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील, आहिरे गावालगत अंजनी नदीवर पुलाचे…
चाळीसगाव : प्रतिनिधी लग्न समारंभात महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल लंपास करणाऱ्या परप्रांतीय संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोदगाव चौफुलीवर मुद्देमालासह चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद केले. चोरीची ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजता घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालवीर माखन सिसोदिया (वय १९, रा. गुलखेडी, ता.पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हॉटेल कमलशांती पॅलेस या ठिकाणी गुन्ह्यातील फिर्यादी सरोज मुकुंद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सरोज यांच्याकडे नवरीचे सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल असा…

