जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात काहीही कारण नसताना मला का चिडवता, असा जाब विचारल्याने २० वर्षीय तरुणाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली असून यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बहिणीलादेखील शिवीगाळ करीत तिची पोत तोडली. ही घटना ७ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील रहिवासी आवेश गुलाम रसूल शेख (२०) या तरुणाला दोन जण चिडवत होते. त्या विषयी तरुणाने जाब विचारला असता दोघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. भांडण विकोपाला गेल्याने तरुणाची बहिण भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलादेखील शिवीगाळ करीत तिची पोत तोडली. या प्रकरणी तरुणाने…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी बसमधील गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोख रक्कम असा ४० हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी दुपारी धरणगाव बसस्थानकात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कुकावल येथील रहिवासी भारती जालिंदर पाटील (वय ४०) या गुरुवारी कुकावल येथे जाण्यासाठी धरणगाव बसस्थानकात आल्या. जळगाव- अंकलेश्वर जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील २१ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दागिने आणि ४ हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला. चोपडा…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी कंटेनरमधून निर्दयतेने ५४ म्हशींचे पारडू (हेला) कोंबून नेताना तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ एक टँकर मुक्ताईनगर तालुका गोरक्षकांनी बुधवारी दि.६ दुपारी पोलिसांना पकडून दिला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एक दिवसाची पोलिस कोठडी त्यांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कंटेनर (आरजे ११- जीबी ९४८७) जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी कंटेनर थांबवून त्यामध्ये काय आहे, याची पाहणी केली. तेव्हा कंटेनरमध्ये सुमारे दोन वर्ष वयाचे ५४ म्हशीचे पारडू कोंबून घेऊन जाताना आढळले. कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा परवानाही नव्हता पोलिसांनी हे दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे म्हशींचे ५४ पारडू व दहा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा…
पहूर : प्रतिनिधी सायकलस्वार वडील व मुलीस ट्रकने जोरदार धडक दिली. यात मुलगी जागीच ठार, तर वडील जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता पहूर-छ. संभाजीनगर महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (११) ही पाचवीतील विद्यार्थिनी शुक्रवारी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनात निवड प्रक्रियेसाठी शाळेकडून पत्र घेऊन जळगावाला येणार होती. त्याआधीच हा अपघात घडला. पहूर कसबेतील रहिवासी पत्रकार व शिक्षक शंकर भामेरे (४०) व कन्या ज्ञानेश्वरी हे सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाले. छ. संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीवरील अर्धवट पुलाच्या कामाच्या ठिकाणी मागून आलेल्या ट्रकने सायकलला जबर धडक दिली. यात शंकर…
गडचिरोली : वृत्तसंस्था भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृद्ध आजी-आजोबांसह नातीची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्यादृष्टीने तपास चक्रे गतिमान केली आहेत. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. यामध्ये अर्चना रमशे तलांडे (१०, रा. येरकल, ता. एटापल्ली), देवू दसरू कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५, रा. गुंडापुरी, ता. भामरागड) अशी मयतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मुलगी मरकल (ता. एटापल्ली) येथे राहते. चौथीत शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळी सुटीत आजी-आजोबांकडे आली होती.
चोपडा : प्रतिनिधी नाशिक, धुळे, जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चोपडा येथील चार गुटखा विक्रेत्यांकडून सुमारे १ लाख ६७ हजारांचा गुटखा जप्त करत चारही दुकानांना सील केले आहे. आठवडाभरात ही सलग दुसरी कारवाई असल्याने अवैध गुटखा विक्रेत्यात खळबळ माजली आहे. चोपडा शहरात सकाळी १० वाजता नाशिक व जळगाव, धुळे येथील अन्न व औषध प्रशासन पथकाने एकूण चार दुकानदारांची तपासणी करत दुकानात विकल्या जाणाऱ्या विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी जप्तीची कारवाई केली. एकूण १ लाख ६७ हजार २५७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांकडे छापा टाकला असता एकूण १ लाख ६७ हजार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मनियार लॉ कॉलेज परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या नावे एमआयडीसीत असलेला प्लॉट हा पॉवर ऑफ अॅटर्नीचे बनावट दस्ताऐवज तयार करून २ जणांना विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मणियार लॉ कॉलेज परिसरातील मंजुदेवी लिच्छिराम छाजेड (वय ५७) या परिवारासह वास्तव्याला आहे. मंजुदेवी छाजेड आणि त्यांची वहिनी मंजुदेवी अशोककुमार बुच्चा यांच्या नावावर एमआयडीसी वसाहतमध्ये एम. सेक्टर मधील प्लॉट नंबर २११ येथे १५०० स्क्वेअर मीटर जागा आहे. दरम्यान, त्यांची वहिनी मंजुदेवी बुच्चा आणि त्यांचा भाऊ अशोककुमार मोतीलाल बुच्चा (दोन्ही रा. गंधर्व कॉलनी) यांनी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांदेड येतील गुरे चारण्यासाठी तापी काठच्या शेत शिवाराकडे दि.६ रोजी गेलेल्या एकावर आगेमोहळाच्या मधमाश्यांनी हल्ला केला. गंभीररीत्या चावे घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. सुकदेव धनसिंग कोळी (४८) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदीकाठालगतच्या शेतशिवाराकडे सुकदेव हा गुरुवारी गुरे चारण्यासाठी गेला होता. गुरे चरत असताना अचानक आगेमोहळाच्या मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी त्याच्या संपूर्ण चेहऱ्यासह हातापायांवर कडाडून चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी घडली. जखमी अवस्थेत तो तेथेच पडून होता. सायंकाळी तो घरी न परतल्याने त्याचे नातलग व घराजवळील काही लोक शोध घेण्यासाठी गेले असता तो अत्यवस्थ स्थितीत तेथेच पडून असल्याने दिसून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यातील विवाहित महिलांना हुंड्यासाठी छळ करीत असल्याच्या घटना नियमित घडत असतात अशीच एक धक्कादायक घटना केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये 26 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी या मुलीचा बळी दिला गेला. कुटुंबीय हुंड्याची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. शहाना यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी महिलेच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. शहाना तिची…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालकपदी तसेच विभागीय अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. पवार सलग दोन्ही पदांवर दुसऱ्यांदा बिनविरोध झाले आहेत. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ७ जानेवारी रोजी नागपूर येथे मतदान होणार आहे. ही निवडणूक राज्यातील अकरा विभागीय मंडळातून होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत होती.

