परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांन चांगलेच हैराण केले असतांना त्यामुळे अनेकांचे उत्पन्नात मोठी घट देखील झाली आहे. वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजल्यामुळे त्याची पत खालावली आहे. या पावसाने भिजलेल्या कापसाला भाव देखील कमी दिला जात आहे. शेतकऱ्याला ६ हजार इतका दराने हा कापूस विकावा लागत आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला. त्याचवेळी वेचणी राहिलेल्या शेतासाठी घातक ठरला आहे. या पावसाने फुटलेला कापूस भिजला, काही ठिकाणी खाली पडल्याने प्रतवारी खराब झाली आहे. शिवाय हा कापूस भिजला असल्याने व्यापारी आता कमी भावात मागत आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या सोशल मिडीयाच्या युगात कोण कुणाच्या प्रेमात पडते कुणीही सांगू शकत नाही अशीच एक घटना घडली आहे. तीन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाचं आपल्याच सासूवर प्रेम जडलं. खरं तर सासू देखील त्याच्या प्रेमात पडली होती. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला होता, की त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं. अशातच पत्नी झोपी गेल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं. मिळालेल्या माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लग्न झाले होते. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन अपत्ये देखील झाली. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली व महिलांना टार्गेट करीत त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी पीडित महिला कटनी रेल्वे स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली. तिला उचाहराला येथे जायचं होतं. दरम्यान, आरोपी ट्रेनमध्ये…
कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत तिची हत्या करणाऱ्या तिचा प्रियकर भूपेंद्र गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत महिला ज्योती तोरडमध्ये आणि भूपेंद्र गिरी यांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र ज्योती भूपेंद्र सोबत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे संतापलेल्या भूपेंद्रने ज्योतीची लॉजमध्ये गळा आवळून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील तृप्ती लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणाहून स्केअर ट्यूब, चॅनल, स्टील रॉड असे साहित्य चोरी झाल्याची घटना शनिवार घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्टोअरकिपर नितीन धाईतडक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी अल्ताफ पठाण यांच्यासह पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एका भंगार व्यवसायिकाकडे लोखो रुपयांचे साहित्य तीन तरुणांनी विक्रीला आणल्याची माहिती…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय मुलीचा विनयभंग ५७ वर्षीय व्यक्तीनेकेल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात संतापाची भावना निर्माण झाली. चोपडा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात मुलीचे आई-वडील शेतात ऊसतोड करण्यासाठी गेले असताना अशोक देवराम पाटील (वय ५७) हा त्यांच्या घरी गेला. तिथे त्याने ७ वर्षीय मुलीशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. घडलेली घटना पीडित मुलीने घराबाहेर येऊन मोठ्या बहिणीला सांगितले असता मोठ्या बहिणीने मुलीच्या आई वडिलांना ती गोष्ट सांगितली. त्यावरुन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक पाटील याच्या विरोधात पोस्को, अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत व कलम…
जळगाव : प्रतिनिधी जुना वाद उफाळून समतानगर परिसरात रविवारी झालेल्या अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना वाद तसेच मयताचे पुतणीसोबत होणाऱ्या विवाहाला मारेकऱ्याचा असणारा विरोध यातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर परिसरात रविवारी अरुण सोनवणे या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे याने रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्याचा चुलत भाऊ गणेश सोनवणे याच्यासोबत झालेला वाद मिटविण्यासाठी अरुण सोनवणे व त्याचा मित्र आशिष सोनवणे यांना सोनू आढाळे (रा. समतानगर) याने वंजारी टेकडी येथे बोलावले.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील जळके येथील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून त्याच्या वायर तोडून एटीएममधील तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळके येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एटीएम केंद्रामध्ये १० डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून त्याच्या वायर तोडल्या. त्यानंतर एटीएममधील २४ हजार रुपये किमतीच्या एकूण तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक दौलत तिवारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असून अनेकांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे अशा तरुणाचे स्वप्न साकार होण्याची बातमी समोर आली आहे. आता थेट समाजकल्याण विभागामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मोठी मेगा भरती सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या समाजकल्याण विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी संबंधित अधिकृत साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया 200 पदांसाठी सुरू आहे. 15 डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी jkssb.nic.in या साईटला भेट देऊन अर्ज करावा. 40 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा इंग्रजीमध्ये पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात राजस्थानातील राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण तापले होते. आता याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना चंदिगड येथून अटक केली. तिघेही चंदिगड सेक्टर 22 ए येथे लपून बसले होते. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत तिघांनाही पकडले. रोहित राठोड, नितीन फौजी, आणि उधम अशी तिघांची नावे आहेत. तिघांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर जयपूरला नेण्यात आले. याआधी जयपूर पोलिसांनी शूटर्सची मदत करणाऱया रामवीरला अटक केली होती. तिघांमधील एक रोहित राठोड (गोदारा) हा गँगस्टर लॉरेन्स विष्णई गँगचा असून त्याने गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली…

