Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था मागील दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे प्रचंड फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यानंतर आता अधूनमधून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे एकामागून एक संकट उभे आहे. अवकाळी पावसानंतर वातावरण बदलले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम पिकांवर झालेला पाहावयास मिळत आहे. यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा आदी पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले असतांना आता अनेकांना थंडीचा तडाखा बसणार आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचाँग चक्रीवादळामुळे देशासह राज्यातील वातावरणात अनेक बदल झाले. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट होते. मात्र आता अवकाळीचे सावट आता कमी झाले आहे. तर येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये वातावरणातील चढ उतार कायम असतील. राज्यातील किमान तापमानत 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पहाटे गारठा, दिवसा काहीसा उकाडा आणि रात्री…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात बसमधील चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चोपडा येथून झुरखेडा येथे मुक्कामी जाणारी बस (एमएच२०/बीएल३५५६) ही बस धरणगाव बस स्थानकावरून निघाली. त्याच वेळेस जळगावकडून धरणगाव शहराकडे येणारा ट्रक (एमएच१८/बीजी११७५) च्या ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला धडक दिली. यात ड्रायव्हर जखमी झाला आहे. अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घरात सर्वजण झोपलेले असताना आरती पंकज चौधरी (वय ३१) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल पेठ परिसरातील चौधरी कुटुंबीय शनिवार, ९ डिसेंबर रोजी रात्री झोपले असताना आरती चौधरी यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री हा प्रकार लक्षात आला. आरती यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी आक्रोश दिसताच केला. या विषयी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी शनिपेठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील तस्मिरा परवेझ सय्यद (वय सात वर्षे) या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आलेल्या नातेवाईकांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात डुप्लेक्स योजनेंतर्गत आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत…

Read More

जामनेर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे मध्य प्रदेशातून जाणाऱ्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनासह ४५ लाखांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सत्र सुरू होते. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एच.आर.५५/डब्ल्यू ४९८० क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमध्ये देवास, मध्य प्रदेश येथे माल भरण्यात आला. हा ट्रक मध्य प्रदेशातून पहूर मार्गान छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली. त्यानुसार पथकाने छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून मालवाहू ट्रक ताब्यात घेतला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरील कन्हान रेल्वेस्थानकावर तिसरा रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळकडून धावणाऱ्या एलटीटी हटिया एक्स्प्रेसचाही समावेश आहे.क्र. २२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस १२ डिसेंबर, क्र. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ११ डिसेंबर रोजी, तर क्र. १३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस १२ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस ११ डिसेंबर, तर क्र. १२९०१ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस ११ व १२ डिसेंबर रोजी, क्र.१२९०२ शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ११, १३ व १४ डिसेंबर रोजी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना बरेली-नैनिताल महामार्गावर शनिवारी रात्री ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका भीषण अपघातात एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात टायर फुटल्याने उत्तराखंडहून आलेल्या डंपरची धडक बसल्याने हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाला उपस्थित लावून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार सेंट्रली लॉक असल्याने सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकने धडक दिल्यानंतर कारचा टायर फुटला आणि कार महामार्गाच्या विरुद्ध बाजूला पलटी झाली. उत्तराखंडमधून रेती घेऊन आलेल्या या ट्रकने कारला काही अंतर फरपटत नेलं. ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्यामुळे वातावरण तापले होते तर आता आ.रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे देखील वातावरण तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. दरम्यान रोहित पवाार पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे. राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकरी प्रचंड अडचणीत आले असून शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजप व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे, विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब…

Read More