Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केवळ तीन तासात पोलिसांनी ठोकल्या दागीने चोरट्याला बेड्या !
    क्राईम

    केवळ तीन तासात पोलिसांनी ठोकल्या दागीने चोरट्याला बेड्या !

    editor deskBy editor deskDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    लग्न समारंभात महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल लंपास करणाऱ्या परप्रांतीय संशयित आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोदगाव चौफुलीवर मुद्देमालासह चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद केले. चोरीची ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजता घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालवीर माखन सिसोदिया (वय १९, रा. गुलखेडी, ता.पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हॉटेल कमलशांती पॅलेस या ठिकाणी गुन्ह्यातील फिर्यादी सरोज मुकुंद देशपांडे यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सरोज यांच्याकडे नवरीचे सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला. चोरी केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील आणि धुळे-कन्नड बायपास रोडवरील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याच्या आधारे आरोपी बालवीर माखन सिसोदिया याला कोदगाव चौफुलीवर तीन तासांत अटक केली.

    यांनी केली कारवाई
    पोउनि योगेश माळी, पोना दीपक पाटील, पोकों नंदू महाजन, पोकॉ अजय पाटील, पोहेकों राहुल सोनवणे, पोकों विनोद खैरनार, पोकों रवींद्र बच्छे, पोकों आशुतोष सोनवणे, पोहेकों नितीन वाल्हे यांनी ही कारवाई केली आहे. अवघ्या तीन तासांत संशयित आरोपीला अटक केल्याने लग्नातील वधू व वराकडील नातेवाइकांनी कौतुक करुन पोलिसांना गौरविले. पुढील तपास पोना दीपक पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.