धुळे : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सुरु असून त्याची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच इंदोरहून कंटेनरमधून वाहतूक केला जात असलेला ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली. इंदोरहुन भिवंडीच्या दिशेने जात असलेला हा गुटख्याने भरलेला कंटेनर नेला जात असल्याची माहिती देखील कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालकाने दिली आहे. या कारवाईत जवळपास ४२ लाखाहुन अधिकचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील अट्रावल तसेच उत्राण, ता.एरंडोल येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे (41, अट्रावल, ता.यावल) तर कासोदा हद्दीतील भिकन रमेश कोळी (35, उत्राण, ता.एरंडोल) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आगामी काळात आणखी काही उपद्रवींवर हद्दपारी तसेच स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. अट्रावल, ता.यावल येथील पिंटू तायडे विरोधात यावल पोलिसात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यात प्राणघातक हल्ला, दंगल, विनयभंग यासह अन्य गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयिताविरोधात एक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आहे. त्यानंतरही कृतीत सुधारणा…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागामधील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मन्याड धरणातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या गुप्त माहितीनुसार, सदर पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून धुळे येथील एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नागझिरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या नागझिरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात एका बाजूला अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या संदर्भात धानोरा गावाचे उपसरपंच अनिल भील यांनी जळगाव तालुका पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील समता नगरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चॉपरने वार करून अरुण बळीराम सोनवणे (वय २८) या तरुणाचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने तिसऱ्या संशयिताला अटक केली आहे. प्रवीण उर्फ दोघ्या पिंट्या शिरसाळे असे संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण सोनवणे सोबत प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या या संशयीताच्या पुतणीचे लग्न ठरले होते. या लग्नास योद्धा उर्फ पिंट्या याचा विरोध होता. यातूनच अरुणचा खून झाला असल्याची माहिती समोर आली होती. संशयीत अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एका मुलाने पाकिस्तानला भारतीय नौदलाची गुप्त माहिती पुरविल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या दाखल गुन्हयातील संशयित गौरव पाटील हा तरूण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या पालकांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील प्रमुख आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास…
जळगाव : प्रतिनिधी कानळदा ते जळगाव रोडवर आव्हाणा फाट्याजवळ दि. १३ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक करीत असताना तालुका पोलिस पथकास आढळून आले. यावेळी संशयित दोन्ही आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या ट्रकमधून दोन ब्रास वाळूची वाहतूक करीत असताना पोलिस पथकाला दिसले, पथकाने त्यांचा पाठलाग केला असता कारचालक श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी व ट्रकचालक (नाव माहीत नाही) फरार होण्यात यशस्वी ठरले. यावेळी ६ हजार रुपये किंमतीची वाळू, ५ लाखांचा ट्रक, ३ लाखांची कार हस्तगत करण्यात आली. तालुका पोलिसांत विविध कलमांन्वये पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस…
भुसावळ : प्रतिनिधी चोरीच्या संशयातून गोरखपूर -एलटीटी गोदान एक्स्प्रेसच्या एसी डब्यात अल्पवयीन मुलीला चौघांनी मारहाण करत केस कापले. ही घटना जबलपूर-इटारसी दरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोदान एक्स्प्रेसने (११०५६) बी/५, सीट क्रमांक ३७ ते ४० वर सनीसिंगकुमार राकेशसिंग (३०) काजल सनीसिंगकुमार (२५) सुमितसिंग राकेशसिंग (२९) नीलम सुमितसिंग (२७, सर्व रा. जोनपूर) प्रवास करत होते. दरम्यान, तिकीट तपासणीसाने डब्यात चोरी तर झाली नाही ना? असा प्रश्न केला. प्रवाशांनी आपआपले सामान तपासले. त्यात नीलम सुजितसिंग यांचे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात आले. यावेळी गाडीची तपासणी केली असता एका अल्पवयीन मुलीवर संशय…
चोपडा : प्रतिनिधी चोपड्यानजीक गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जीममधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले. रूपेश तुळशीराम कोळी (१७) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर भावेश मोहन सोनवणे (१७) आणि साहिल शकील पिंजारी (१९, तिघे रा. चहार्डी, ता. चोपडा) हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जीम आटोपून तिघे चहार्डीकडे निघाले होते. वाटेत समोरून येणाऱ्या बसची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामुळे तिघेही जण दूर फेकले गेले. तिघांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रूपेश कोळी या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिके जळाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता.१४) प्रातिनिधिक स्वरूपात बिलाखेड, डोणदिगर, हिरापूर, शेवरी, रोहिणी व खडकी या गावातील दुष्काळी भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकात केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एच.आर.खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहायक संचालक जगदीश शाहू यांचा समावेश होता. तर त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश अवताडे, पशुसंवर्धन विभागाचे…

