जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुली व विवाहित महिलासोबत विनयभंग केल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घराशेजारी राहणारा संशयित आरोपी योगेश तेजमल पवार हा तिच्या घरी येवून तिला सांगितले की तुला माझ्या बायकोने घरच्या मजल्यावर बोलावले आहे, असे सांगितले. त्यानुसार पिडीत मुलगी ही संशयित आरोपीच्या घराच्या वरच्या…
Author: editor desk
धुळे : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकारामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले असून काहींनी तर आता शेतीच्या पिकावर रोटावेटर फिरविल्याच्या देखील अनेक घटना घडत असतांना खान्देशातील देखील शेतकरी हा मार्ग अवलंबू लागले आहे. रब्बी हंगामात उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावर मक्याची लागवड केली होती. पिकाची थोडी वाढ झाल्यानंतर त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. यामुळे शेतकऱ्याने तीन एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरविला. शिरपूर तालुक्यातील भामपुर या परिसरात दीपक पाटील या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. सततच्या हवामान बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने तीन वेळा औषध फवारणी केली. तरी देखील कुठल्याही प्रकारचा अळीचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनात भाजपचे नेते नितेश राणे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असून राणे यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा पासपोर्ट जमा करा, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच दिशा सालियान प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होईल. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईल आणि दिशा सालियानला न्याय मिळेल. असं नितेश राणे म्हणालेत. हिवाळी अधिवेशनावेळी नितेश राणे माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही मागणी केली आहे. मी सरकारचे आभार मानेल. दिशा सालियन असो सुशांत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सुरक्षा दलाच्या एका चौकीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण दहशतवादी हल्ला झाला. सहा दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक चौकीमध्ये घुसवल्यानंतर लागोपाठ आत्मघाती स्फोट केला. या हल्ल्यात २३ जवान ठार, तर अनेक जण जखमी झाले. सर्व दहशतवाद्यांना मारण्यात यश आल्याची माहिती पाकच्या लष्कराने दिली. तेहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अशांत डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले ट्रक धडकवले. यानंतर भीषण आत्मघाती स्फोट घडवण्यात आल्याने इमारत कोसळली. चौकीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ट्रकला रोखण्याचा प्रयत्न झाला होता. पण दहशतवाद्यांनी ट्रक थेट इमारतीवर धडकवल्याने एकच खळबळ उडाली. दहशतवादी हल्ला…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बहाळ येथे गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याने अनेक ठिकाणी जनावरांच्या शिकारी केल्या आहेत. तसेच मादीसह दोन बछड्यांचे नेहमी परिसरात दर्शन होत आहे. आता पुन्हा बिबट्याने वासरू फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने गावालगतच हाकेच्या अंतरावर असलेल्या नथ्थू पुना परदेशी यांच्या मालकीच्या शेतातून गायीचे वासरू फस्त केले आहे. त्यामुळे बहाळसह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. दरम्यान, या संदर्भात वनविभाग अधिकारी शितल नगराळे यांना अनेक ठिकाणी कॅमेरे देखील लावले आहेत. परंतु बिबट्याकडून नेहमी हुलकावणी दिली जाते. परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शेताचे कामाची धावपळ होत आहे. परिसर बिबट्या असल्यामुळे मजूर कामाला येण्यासाठी धास्तावत नाहीत.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतांना नुकतेच दुचाकीने घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे रत्ना छगन वाडेकर (वय ५५, रा. सिंधी कॉलनी) या जखमी झाल्या. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात रत्ना वाडेकर या वास्तव्यास आहे. त्या आपल्या दुचाकीने ( एमएच १९, एपी ३२५२) ने घरी जाण्यासाठी निघाल्या. काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे येताना भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेला रस्त्यावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाकाजवळ अज्ञात पाच जणांनी दोन जणांना काठीने बेदम मारहाण करून मोबाईल २ हजार रुपयांची रोकड आणि २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकारे रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगाना राज्यातील कोयागुड्डू मंडळ येथील मिलवकुमार पुनम (वय-२८) आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र बुकीया हरिलाल हे दोघे जण सोमवारी रोजी सकाळी ९.३० वाजता भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशन ते जुना टोल नाका…
भुसावळ : प्रतिनिधी स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने विरारच्या सराफाला भुसावळात बोलावून दोघा भामट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तातल्या सोन्याच्या आमिषाला सराफा पडला बळी विरारमधील सराफा व्यावसायीक राजकुमार जवाहर सोनी (38, विरार ईस्ट, रामू कम्पाउंड, सी विंग, विरार) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा परीचीत मित्र अजय नारायण कुंभार (ठाणे) याने मित्र सुरजसिंग कडे तीन हजार ५०० सोने आहे व तो स्वस्तात ते विक्री करणार असल्याचे सोनी यांना सांगितले. स्वस्तात सोने मिळणार असल्याने या आमिषाला सोनी हे बळी पडले व त्यांनी सुरजसिंगशी संपर्क साधल्यानंतर…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील सामनगाव रोड भागात कार अडवून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत टोळक्याने वाहनाचे नुकसान करीत जखमी युवकाचा मोबाईल व रोकड पळविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगताप,रोशन ढोकणे,प्रविण जगताप,राहूल जगताप व अन्य दोन अनोळखी तरूण अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत विजय भरत धिवर (२५ रा.गोरेवाडी जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. धिवर शनिवारी (दि.९) रात्री सामनगाव रोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संजीवणी हॉस्पिटल भागात टोळक्याने त्यांची कार अडवून सचिन जगताप यास का मारहाण केली याबाबत जाब विचारला. धिवर हे त्यांना…
अनेक लोकांना नेहमीच हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरूम म्हणजेच ब्लॅकहेड्स काढण्यासाठी महिला कित्येक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या या ब्लॅकहेड्समुळे प्रत्येक महिला त्रस्त राहत असून ते दूर करण्यासाठी महागडे क्रिम्स लावून ते घालवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, नारळ, गाजर यांचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी स्क्रब बनवू शकता. परंतु, हे स्क्रब कसे बनवायचे ते जाणून घ्या… १. गाजराचा स्क्रब: तुमची त्वचा जर निस्तेज झाली असेल आणि त्यावर तुम्हाला तेज आणायचे असेल तर तुम्ही घरी बसल्याच गाजरापासून चेमिकॅल मुक्त स्क्रब बनवू शकता. यासाठी अगोदर गाजर किसून घ्या. त्यामध्ये दही, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण १०…

