Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारची कठड्याला जबर धडक ; एक ठार !
    क्राईम

    कारची कठड्याला जबर धडक ; एक ठार !

    editor deskBy editor deskNovember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    भरधाव वेगात चारचाकी पुलाच्या कठड्याला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपिंगजवळील रहिवासी भगवान दलपत सपकाळे ( वय ६३) हे विजया भगवान कोळी (५५) आणि कुंतला भगवान कोळी (२४) यांना चारचाकी (एमएच १९ एएक्स ६४५३) वर अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. वेगाने वाहन चालवल्याने जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्याजवळ पुलाच्या कठड्याला चारचाकी धडकली. त्यानंतर उलटून त्यात भगवान सपकाळे जागीच ठार झाले. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही गंभीर जखमी झाल्या. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

    घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.