Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या २०१९ मध्ये जगभरात कोरोना या आजार चव्हाट्यावर आला असतांना आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार JN.1 समोर आल्याचे समजते आहे. याच आजाराचा रुग्ण भारतात देखील आढळून आले आहेत. देशात केरळ राज्यात या विषाणूची लक्षणे आढळून आली असून, त्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात केरळच्या शेजारील राज्य कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. केरळमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे 2 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेजारील राज्य कर्नाटक देखील सतर्क झालं आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांबाबत सांगितले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरु असतांना नुकतेच दमण बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणण्यासाठी तस्करांकडून विविध क्लृप्त्या लढवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. अशाच एका घटनेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेतून करण्यात येणारी दारूची तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी उघडकीस आणली. या कारवाईत जवळपास 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईची कुणकुण लागताच रुग्णवाहिकेचा चालक पसार झाला आहे. प्रकरणी दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दमन बनावटीच्य दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुरुवारी मिळाली होती. मिळालेल्या…

Read More

धुळे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार असल्याने अनेक तरुण उद्योगासाठी अनेक ठिकाणी कर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात तर शून्य टक्के दराने ५० लाखांचे कर्ज देतो, यासाठी आधी विमा पॉलिसी काढा; असे आमिष दाखवून एकाने दोन जनाची फसवणूक केली. यात दोघांना दहा लाखांचा गंडा घातला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत तोतया व्यवस्थापक याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथील अजय शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मोबाईलवर संतोष वामन भोसले याने बजाज फायनान्स कंपनीचा अकाउंट व्यवस्थापक आहे, असे सांगून संपर्क केला. तसेच इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.ची विमा पॉलिसी घेतल्यास शून्य टक्के…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपुरातील एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशभरातील अनेक तरुणासह प्रौढाना खूप कमी वयात अनेक आजाराची लागण होत आहे. तर ह्र्दयविकाराचा धक्का देखील अनेकांना येत असतांना नुकतेच कोल्हापूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले उपनिरीक्षक प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४, मूळ रा. अंगापूर, जि. सातारा) यांना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागले. काही वेळातच ते कार्यालयात कोसळले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राज्यपाल रमेश बैस आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या बंदोबस्त तयारीची लगबग सध्या पोलिस दलात सुरू आहे. याच गडबडीत असताना भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. मात्र,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील गोपाळ एकनाथ शिंदे हे जळगाव शहरातील एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी आलेले असतांना त्यांना मारहाण करून पैसे काढून नेल्याप्रकरणी राकेश भीमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) व त्याचा साथीदार गोपाळ रवींद्र पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी गोपाळ शिंदे हे त्यांच्या मालवाहू रिक्षाने औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीमध्ये साहित्य पोहोचविण्यासाठी गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातून बळजबरीने तीन हजार ५०० रुपये काढून घेतले होते. या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था दोन वर्षांपूर्वी ज्यांनी हनुमान चालिसा पठणाला विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेचे हनुमानाच्या कृपेने दहन झाले आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. रामलल्ला व हनुमान यांच्या आशीर्वादानेच सर्वसामान्यांच्या मनातील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. ज्यांनी १४ दिवस राणा दाम्पत्याला जेलमध्ये टाकले, त्यांची सत्ता बदलवण्याचे काम मी केले, असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यातील अमरावती येथे शनिवारपासून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता कथेला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, खोट्या आणि अहंकारी सत्तेची हवा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील आशा कॉम्प्लेक्सजवळ शाळेतून घरी जात असताना १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याला ट्रकचा धक्का लागला. त्यात त्या मुलाच्या उजव्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोड येथून महामार्गाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ०४ बीयू ३५७२ हा आशा कॉम्प्लेक्स येथून जात असताना त्याच वेळेस काशीफ जफर शेख सय १३, रा. मुस्लिम कॉलनी) हा शाळेतून सायकलने घरी जात होता. ट्रकचालक फैजान खान अमन खान (वय २०, रा. वरदी, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने काशीफला धडक देत त्याच्या उजव्या पायावरून चाक नेले. यामुळे काशीफला गंभीर दुखापत झाली असून, त्यास पुढील…

Read More

अकोला प्रतिनिधी : मनीष खर्चे अकोला। विदर्भातील जंनतेला न्याय देन्यासाठी नागपुर करार करण्यात आला होता. त्या करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे घेणे आणि ते पण किमान ६ आठवड्याचे मात्र आजपर्यंतची अधिवेशने ही ६ते १०दिवसात आटोपली ती पण विदर्भातील मुद्यांवर न होता केवळ हुलड बाजी करण्यात येत आहे. यावर्षीच्या अधिवेशनात चिल्लर विषयांवर चर्चा करून अधिवेशन पार पाडले जात आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटिल व छगन भुजबळ यांच्यातच चर्चा करण्यात वेळ वाया घालवला गेला आहे. त्यामुळें विदर्भ मुद्यांवर चर्चा करण्यासाठी नागपुर करारा नुसार अधिवेशन घेतलें जात नसल्याचे आरोप करीत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीपूर्वीच भाजप जोरदार कामाला लागली असून नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय २०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना विरोधकांवर टीकास्र सोडले. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचे होते, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आरक्षणशिवाय दुसरा मुद्दा नाही का? असे सुप्रिया सुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणाल्या होत्या, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून…

Read More