छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना गेल्या काही वर्षापासून घडू लागल्या आहेत. अशीच एक थरारक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. गेल्या चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे आनंद…
Author: editor desk
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच भंडारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीची बाजू मांडणाऱ्या महिला वकिलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरिता माकडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपीचे नाव महेश डोकरिमारे असे असून माझ्याविरुद्ध ते केस का लढत आहेस, असा जाब विचारून त्याने वकील सरिता माकडे यांच्यावर हल्ला केला. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सरिता या वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपी महेश याच्याविरुद्ध घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. सरिता या त्याच्या पत्नीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. याच रागातून आरोपीने हा हल्ला केला.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज पुन्हा एकदा शहरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका – उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने मारहाण केली. याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उपहारगृहातील कामगार रुपेश आणि रमेश दुचाकीवरुन एनडीए रस्त्याने निघाले होते. यावेळी शिवणे परिसरात दोघांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘मी या भागातील दादा आहे. बाजूला चल मी तुला दाखवितो..’ अशी धमकी या दोघांना दिली. तसेच एकाने त्याच्याकडील कोयता उगारुन मारहाण…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात चोरी व दरोड्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील वाघजाळ या गावात सशस्त्र दरोडा पडला असून पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजार रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था ७ वर्षीय चिमुकला शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळता-खेळता एका खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी १० वर्षीय बहिणीने देखील भरलेल्या डबक्यात उडी मारी. मात्र, पाणी जास्त असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमध्ये घडली. समर्थ राहुल देशमुख (वय ८ वर्ष) आणि चैतली राहुल देशमुख (वय १० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या बहिण-भावंडाची नावे आहेत. या घटनेनं देशमुख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल देशमुख पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह वाळूज महानगरातल्या बजाजनगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये भाड्याने राहतात. त्यांना चैताली आणि समर्थ दोन मुले आहेत. चैताली चौथीत तर समर्थ…
मुंबई : वृत्तसंस्था अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकत असून याच शाळेच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रम दि.१५ डिसेंबर शुक्रवारी होता या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वेगळ्या कारमधून येताना दिसले. वेगवेगळ्या कारमधून येणा-या कपलला पाहून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या विभक्त झाल्याची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या आता अभिषेक आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. ती त्यांच्यापासून वेगळी तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही ऐश्वर्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनफॉलो केले होते. ऐश्वर्या इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चनशिवाय इतर कोणालाही फॉलो करत नाही. अशा परिस्थितीत बच्चन कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज वर्तवला…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी अमोल संसारे (वय ३१) याने अल्पवयीन मुलीस आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अल्पवयीन मुलीने विरोध करत जोराने ओरडली असता अमोलने पीडितेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १५ डिसेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित अमोल संसारे याच्याविरुध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस…
अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील शिर्डी शहरातील नगर- मनमाड रोडनजीकच्या हॉटेलमध्ये साईदर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण-भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल किशोर वारुळे (वय 30, रा. खैरी निमगाव, हल्ली चाकण, पुणे) व निकिता किशोर वारुळे (वय २५) या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलचालक वसीम आयुब शेख (रा. शिर्डी) यांनी घटनेची माहिती शिडीं पोलिसांना दिली. मयताने डायरीवर वडिलांचा फोन नंबर लिहून ‘आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे लिहिले होते.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायल संदीप चौधरी रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा या गावात पायल संदीप चौधरी ही तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून गुरुवार १४ डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी ४ वाजता उघडकीला आला. दरम्यान तरूणीने गळफास घेतल्याचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पुरुष व स्त्री जातीचे नवजात अभ्रक अनेक ठिकाणी बेवारस आढळून येत असतांना आज पुन्हा एकदा पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक पुरुष जातीचे नवजात अभ्रक कचऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानासमोरील रस्त्यावर शुक्रवारी दि.१५ सकाळी आठच्या सुमारास हे अभ्रक सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक दिसले. त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात…

