Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामानिमित्त घराबाहेर पडला अन रात्री आढळला तरुणाचा मृतदेह !
    क्राईम

    कामानिमित्त घराबाहेर पडला अन रात्री आढळला तरुणाचा मृतदेह !

    editor deskBy editor deskNovember 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील पवन नगरातील २४ वर्षीय तरुण रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री २ वाजेपुर्वी घडली. या अपघातात दीपक सुकलाल सोनवणे (वय २४) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पवन नगरात दीपक सोनवणे हा कुटुंबियांसोबत वास्तव्याला होता. कटलरी व मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिपक सोनवणे हा कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास खांबा क्रमांक ४२० च्या २६ ते २८ च्या सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दीपक भादली ते जळगाव अप रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्याला रेल्वेची धडक लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वेवरील लोको पायलट रामेश्वर प्रसाद यांनी वॉकीटॉकीवरून शनीपेठ पोलीसांना दिली.

    त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रविंद्र पाटील, परिष जाधव, मुकुंद गंगावणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनाम करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. सोमवारी घटनेची माहिती दीपकच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना मिळताच त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्र परिवाराची मोठी गर्दी होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.