Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  शहरात चोरून लपून दुचाकीवरून गांजा आणणाऱ्या दहिवद येथील तरुणावर अमळनेर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याजवळून ११ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी दि. १ मध्यरात्री १:४० वाजता धुळे रोडवर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात एक तरुण दुचाकीवर गांजा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाल्यावर त्यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना माहिती देऊन ताबडतोब हेकों किशोर पाटील, शरद पाटील, नीलेश मोरे, रवींद्र पाटील, दीपक माळी, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन यांना घेऊन धुळे रस्त्यावर हॉटेलजवळ दबा धरून बसले. एक तरुण दुचाकीला दोन काळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन दुकानाच्या मागे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता व चॉपर घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तीन जण शनिपेठ पोलिस चौकी परिसरात घातक हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता दुचाकीवरून जाणारे विशाल अशोक पाटील (२८, रा. चौगुले प्लॉट), निर्मल नंदू अहिरे (२३, रा. मेस्कोमाता नगर), सतीश…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील लोहारा परिसरात दूधवाहक वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कळमसरा गावानजीक मंगळवारी सकाळी घडली. घटनेनंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश करत चालकाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, येथील गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर हे शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत नोकरीला आहेत. ते दुचाकीने (एमएच १९ डीएन ७६६२) शेंदुर्णीत जात असताना कळमसरा गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर शेंदुर्णीकडून येणाऱ्या पिकअपने (एमएच १९ सीवाय ५७३१) त्यांना जोरदार धडक दिली. यात गुणवंत यांच्या मेंदूला जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी १० ते १०:१५ वाजेच्या दरम्यान…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना जपानमध्ये पहिल्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले होते हि घटना ताजी असतांना आता जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावर एका विमानाला आग लागली. जपानी न्यूज एजन्सी क्योडोने दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वी हे विमान तटरक्षक दलाच्या विमानाला धडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपान एअरलाइन्सच्या (जेएएल) प्रवक्त्याने सांगितले की, होक्काइडो येथील शिन-चितोसे विमानतळावरून निघालेल्या विमानात सुमारे 367 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. सर्वांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  धरणगाव तालुक्यातील दहावीत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दरवर्षी एक दुचाकी दिली जाते. त्यानुसार यंदा इंदिरा गांधी विद्यालयातील कुमारी चेतना पुरुषोत्तम कोतकर या विद्यार्थिनीला ९८ टक्के गुण मिळाले. ती तालुक्यातून पहिली आल्यामुळे मंगळवारी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते तिला दुचाकी देण्यात आली. गुणवंतांच्या पंखांना बळ देण्याचं मोठं दातृत्व पालकमंत्र्यांनी दाखवून दिल. इंदिरा गांधी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. दुचाकी मिळवलेल्या मुलीचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी संस्थाध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, तहसीलदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, विलास महाजन पप्पू भावे विजय महाजन बुटा पाटील संजय चौधरी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असतांना पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्याचे डीएसपी दलबीरसिंग देओल यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी १ जानेवारी बस्ती बावा खेल कालवाजवळील रस्त्यावर डीएसपी दालबीरसिंग देओल यांचा मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकांसोबत त्यांचा वाद झाला होता, या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस्ती बावा गेमजवळ एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला असता तो डीएसपी दलबीर सिंह यांचा असल्याचे समजले. सुरूवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या मानेत गोळी असल्याचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच ३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यातील टोळक्यांनी दोन जणांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीतील हा प्रकार आहे. रात्रीच्या सुमारास टोळक्यांनी दोघांना मारहाण केल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर भागातील हिंगणे होम कॉलनीत टोळक्यांनी दोन जणांना मारहाण केली. राहुल कावळे आणि निखिल पाबळे असे मारहाण झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ३१ डिसेंबरला भररस्त्यात मारहाण केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री राहुल कावळे आणि निखिल पाबळे हे दोघे रस्त्यावरून जात होते. पुण्याच्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिनापासून हिंसाचाराचे थैमान सुरु असतांना आता मणिपूर राज्य विधानसभेच्या निवडणुका होऊन एक महिनाही पूर्ण होत नाही तोच मणिपूरमध्ये हिंसाचाराने पुन्हा थैमान घातले आहे. मणिपूरच्या मोरेह जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. येथे पोलिस दलावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणाहून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्याही बातम्या येत आहेत. मोरेह जिल्ह्यातील मोरे की लोकेशन पॉइंटकडे जात असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पोलिस कमांडो घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चहानौ गाव ओलांडताना हा हल्ला झाला. या…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुत्केच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. नितीन वाघ असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन आणि पीडित मुलीची १५ दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिला उस्मानपुऱ्यातील येथील एका कॅफेवर भेटण्यासाठी बोलावले. पीडिता कॅफेवर गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटोही काढले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या मयूर प्रशांत पाटील (२१, रा. इदगाव ता. जळगाव) याला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.तरुणाकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ कारवाई करत मयूर पाटील याला ताब्यात घेत त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत…

Read More