Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू
    क्राईम

    लग्नघरी शोककळा : ७ वर्षीय बालिकेचा सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या कुटुंबातील तस्मिरा परवेझ सय्यद (वय सात वर्षे) या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत सेप्टीक टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती.

    मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आलेल्या नातेवाईकांमध्ये निजामपूर ता. साक्री येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात डुप्लेक्स योजनेंतर्गत आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या सात वर्षीय बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.

    काही वेळाने सर्व लहान मुले बांधकामाच्या ठिकाणी, वाळूवर खेळत असताना त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी काही जण गेले असता त्यांना भरलेला सेप्टीक टँक दिसला. त्यावर पाठ्यांनी झाकण्यास सुरवात केली असता टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने डोकावले. त्यावेळी ही बालिका आढळली. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह जळगावला आले होते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या आक्रोशाने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.