पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक तरुणीचे नाव वैष्णवी लाटे असून, तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण छळाचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ऐन उमेदीच्या काळात एका तरुणीने स्वतःचे प्राण संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले असले तरी नंतर पती यशवंत लाटे व सासरच्या इतर सदस्यांनी पैशांच्या मागणीसाठी सतत छळ सुरू केला. पतीकडून होणारी शिवीगाळ,…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार, वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत स्थागुशा पथकाने मोठ्या कारवाईत यश मिळवले आहे. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने संजय गोपाल चंदेले (वय ५०, ऑडन्स फॅक्टरी, वरणगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून एक सिल्वर रंगाची गावठी पिस्तूला (कट्टा) आणि दोन पितळी राऊंड जप्त केले, ज्याची एकूण किंमत अंदाजे २७०० रुपये आहे. हा मुद्देमाल स्थानिक सुरक्षा आणि गुन्हेगारी प्रतिबंधासाठी ताब्यात घेतला गेला आहे. पोलीस पथकातील अधिकारी पोलिस प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी, छगन तायडे, रतन गिते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल…
चाळीसगाव : प्रतिनिधी कत्तलीसाठी निर्दयतेने छोट्या मालवाहतूक वाहनांमध्ये कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या कारवाईत चाळीसगाव शहर पोलिसांनी दोन वाहनांसह सात गोवंश जप्त केले असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मार्च रोजी सकाळी सुमारे १०.२८ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-भडगाव रोडवरील पातोंडा रोड परिसरातील दौलत हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी (क्र. एमएच ५४-०३११) ही गाडी संशयास्पदरीत्या जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी वाहन अडवून पाहणी केली असता, त्यामध्ये सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार गोवंश जातीचे…
जळगाव : प्रतिनिधी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन मयुर रामसिंग दहीयेकर (वय २५, रा. कंजरवाडा) या बँक सेल्स ऑफिसरला दोघांनी हातातील कड्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १३ मार्च रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरातील दर्गाजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महिंद्रा कोटक बँकेत सेल्स ऑफिसर असलेले मयुर दहियेकर हे दि. १३ मार्च रोजी रात्री गेंदालाल मिल परिसरातील दर्गा परिसरातून जात होते यावेळी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन संशयित तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत हातातील कड्याने त्यांच्या तोंडावर बुक्का मारुन गंभीर जखमी केले. तसेच सेल्स ऑफिसर सोबत असलेल्या सहकारी…
आजचे राशिभविष्य दि.१६ मार्च २०२६ मेष राशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज तुम्ही भविष्यातील योजनांवरही विचार करू शकता. हा दिवस तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल. तुमच्या कुटुंबाची, मित्रांची आणि जोडीदाराची तुमच्या जीवनात भूमिका तुम्ही ओळखाल. तुम्ही संयम आणि संयम राखाल, ज्यामुळे तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधणे तुमच्यासाठी सोपे होईल. वृषभ राशी तुम्हाला काही आशादायक गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. तुमच्याकडे नवीन कल्पना येत राहतील. आजचा दिवस नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी चांगला आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना लवकरच फळ मिळू शकेल. जर तुम्ही आज प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर…
मुंबई : वृत्तसंस्था भारत निवडणूक आयोग यांनी रविवारी पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या होत्या. बारामतीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. तर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे.…
धाराशीव : वृत्तसंस्था धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी भीषण तिहेरी अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. करजखेडा पाटीजवळ बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने हा थरारक अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून महामार्गावर रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ आली असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने समोरील वॅगनार कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बोलेरो पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून पलीकडील लेनमध्ये गेली. दरम्यान, समोरून येणारी होंडा सिटी कार बोलेरोवर जोरात आदळल्याने तिहेरी…
जळगाव : प्रतिनिधी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च ते १४ मार्च रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एका भागात एका महिलेला दोन संशयित आरोपींनी संगनमत करून पिडीत महिलेला थंड पेयामधून गुंगीकारक औषध दिले. महिला शुद्धीवर नसल्याचा फायदा घेत राजेश शिवराम पवार आणि राजेंद्र शंकरसिंह पवार यांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पिडीत महिला ही आरोपींची नातेवाईक आहे. हा प्रकार पीडीत महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा यंदा विशेष चर्चेत आला आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेचा अधिकृत टीझर मनसेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला असून, तो अत्यंत आक्रमक आणि थेट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मनसेच्या टीझरमध्ये राज्यातील राजकीय घडामोडीमुळे सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची प्रतिमा उभारीने मांडण्यात आली आहे. टीझरमध्ये काही बोचरे प्रश्न विचारले गेले आहेत: महाराष्ट्रात जे चाललंय ते पटतंय का? रोजच्या राजकीय घडामोडी पाहून मनस्ताप होतोय का? राज्याची ही अवस्था पाहून तुम्ही अस्वस्थ आहात का? या प्रश्नांद्वारे मनसेने सर्वसामान्य जनता एकटे नसल्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशीच भावना…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत, इतरांनी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केल्यास ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान त्यांनी केले. नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक व कामगारांच्या सूचीचे प्रकाशन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यात हिंदूंकडूनच खरेदी करण्याची संकल्पना मांडली. यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, ही संकल्पना योग्य आहे. पूर्वी घारघर येथेही…

