Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नफ्याच्या आमिषातून फसवणूक, नकारानंतर विनयभंग; गुन्हा दाखल !
    क्राईम

    नफ्याच्या आमिषातून फसवणूक, नकारानंतर विनयभंग; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील एका २७ वर्षीय तरुणीला शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठीही संशयिताने दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याबाबत संशयित सिद्धांत मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याला अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धांत हेडा याने तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून तिच्या डिमॅट अकाउंटची माहिती घेतली. त्यानंतर त्या अकाउंटमधून तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून आरोपीने सुमारे १० लाख रुपये लंपास केले. आर्थिक फसवणुकीनंतर आरोपीने या तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने मुंबई ते मंगलोरपर्यंत प्रवासात तिचा पाठलाग करत विनयभंग केला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.