मुंबई : वृत्तसंस्था उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी देण्याबाबत धोरणात सध्या बदल करणे शक्य नाही. मात्र, अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, २००१ मध्ये राज्य सरकारने नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे ८०% विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती व जमातींच्या विद्यार्थ्यांना १००% शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना ५०% सवलत, तर मुलींना १००% सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा खर्च भागवला जात असल्याने सध्या अनुदानित धोरणात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, विधानसभेत काल धर्मस्वातंत्र्य बिलावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना शिवरायांच्या राज्याभिषेकांसंदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले. सभागृहात उपस्थित राहून ते म्हणाले की, आव्हाड यांना या वक्तव्याचे गांभीर्य नव्हते आणि त्यांनी माफी मागायला तयारही नव्हते, ज्यामुळे सभागृह तहकूबले. शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले की, अध्यक्षांनी तीन वेळा आव्हाडांना शब्द मागे घेण्यास सांगितले आणि शेवटी अध्यक्षांच्या कडक सूचनेनंतरच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही, त्यांच्या चेहऱ्यावरून हे वक्तव्य अनावधानाने गेले असल्याचे काहीच जाणवत नव्हते. मंत्री म्हणाले की, “त्यांना निलंबित करायला हवे होते, पण अध्यक्षांनी अखेर त्यांना अंतिम समज दिली.” मंत्री देसाई यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंगळवारी (दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि महायुतीतील समन्वय या मुद्द्यांवर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने एक गोपनीय ‘अंतर्गत अहवाल’ तयार केला असून, मागील तीन निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांत मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने पक्षाच्या उमेदवारांना फटका बसल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांत अशा चुका टाळण्यासाठी आणि महायुतीत समन्वय अधिक बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदे हे हा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून आपली भूमिका ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील हनुमानवाडी परिसरात १५ रोजी रात्री झालेल्या गोळीबारात एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रेल्वे स्टेशनजवळच्या अनिल नगरमधील सिकंदर शेख निसार शेख (वय ३६) हा रिक्षा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणात सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित महेंद्र मोरे, मेहुल रत्नपाल गोरे, कृष्णा जिभाऊ शेळते (सर्व रा. चाळीसगाव) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास हनुमानवाडी येथील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. त्यावेळी…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या शेताला शॉर्ट सर्किटने आग लागून गहू अन् ठिबक नळ्या आदी जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात रोहित्र असून या रोहित्रात पक्षी शिरल्याने शॉर्टसर्किट झाले अन् त्याची ठिणगी उभ्या गव्हाच्या पिकावर पडल्याने आग लागली. काही वेळातच संपूर्ण शेतात आग पसरली. तर, अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी ग्रामस्थांनी पालिकेला कळवले. परंतु, पालिकेने आधी पोलिसांत तक्रार करा, असे सांगितले. तोपर्यंत शेतात आग वाढत गेली. दरम्यान, गावातील श्याम पाटील, भीमराव पाटील सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह…
आजचे राशिभविष्य दि.१७ मार्च २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक राहील. आज अशक्य वाटणाऱ्या एखाद्या कामात तुम्हाला यश मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरशी संबंधित एखादी समस्या दूर होईल. पण कोणतेही काम पुढे ढकलू नका, वेळेत पूर्ण करणेच उत्तम, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. ती चूक करू नका. कुटुंबातील एखाद्या समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी राहतील. मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना टार्गेट पूर्ण करणे सोपे जाईल. वृषभ राशी ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे थकवा जाणवू शकतो. पण जितकी जास्त मेहनत कराल तितके काम सोपे होईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. जोडीदारासोबत नात्यांबद्दल भावनिक होऊ शकता. खर्चावर…
नाशिक: वृत्तसंस्था त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी गावात एका विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी 13 मार्चपासून बेपत्ता होता. काल संध्याकाळी आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. संजय सदू नडगे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील स्वर्गीय मधुकरावर हिरे या अनुदानित शाळेमध्ये दहावीला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपासून संजय हा बेपत्ता होता. कुटुंबीय आणि गावकरी हे विद्यार्थ्याचा शोध घेत असताना शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील तिघा संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली असून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानक येथे क्रमांक ४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा शोध घेत पोलिसांनी…
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे शिस्तीत व पारदर्शक पद्धतीने जनतेला सेवा देण्याचे व्यासपीठ आहे. बिनअडथळा मंजूर होणाऱ्या योजना आणि रयतेच्या न्यायासाठी उभे असलेले शासन या शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील जळके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे’ उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिरासमोरील पटांगणात उत्साहात पार पडले. विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 15 जानेवारीपर्यंत अजित पवारांनी केलेली विधाने आणि त्यानंतर त्यांना अप्रत्यक्षपणे दिले गेलेले इशारे पाहता 28 जानेवारीला झालेला विमान अपघात हा केवळ योगायोग आहे की त्यामागे षडयंत्र आहे, याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदारांनी हा केवळ अपघात नसून संभाव्य घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त…

