जळगाव : प्रतिनिधी वडिलांना मारहाण केल्याच्या संतापातून तिघांवर गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना शहरातील वाल्मिक नगर परिसरातील घरकुल चौकात मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र शनिपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित अनिल रसाल राठोड (रा. श्रीराम चौक, वाल्मिक नगर) याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौकात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांना मारहाण केली होती. या घटनेची माहिती मुलगा अनिल राठोड याला मिळाल्यानंतर तो संतापाच्या भरात…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाणे हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक सत्य समोर आले असून प्रेमसंबंधातून या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती- पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यतील वरसाडे तांडा येथील संजय दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीला भिमा राठोड (वय ३३) यांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही काहिही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कोठेच मिळाला नाही. त्यामुळे पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वढोदा या गावाजवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे अँगल तुटल्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी घडला असून मृत व जखमी सर्व उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार आहेत. तर या अपघात प्रकरणी उशिरापर्यंत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, वढोदा ता. यावल या गावाजवळून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो. या राज्य मार्गावरून शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून यावलकडे येत होते. दरम्यान अचानक धावत्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले आणि अपघात घडला. यात ट्रॉली रस्त्याच्याकडेला…
आजचे राशिभविष्य दि. १५ मार्च २०२६ मेष राशी शेतकऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. सरकारकडून शेतीविषयक साधनसंपत्तीची तरतूद केल्याने शेतीविषयक कामांमध्ये प्रगती शक्य होईल. वैवाहिक जीवनात आनंदाची सुरुवात होईल. जर तुम्हाला आज नवीन उपक्रम सुरू करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमची तयारीही सुरू ठेवावी. रिअल इस्टेटशी संबंधित दीर्घकाळापासूनचे काम आज पूर्ण झाल्याने खूप आनंद होईल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी झुंजणाऱ्यांना आज मोठा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढतीची चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी वातावरण असेल. आज कोणत्याही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका, अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा…
भंडारा : वृत्तसंस्था नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा हृदयद्रावक प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून मित्रासह घरी परतणाऱ्या पित्याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरात गिट्टीने भरलेला १२ चाकी ट्रक दुचाकीवर पलटी झाल्याने झालेल्या या अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश सावस्कार (वय ४८) यांच्या मुलीचे लग्न २ एप्रिल रोजी नियोजित आहे. लग्नाच्या तयारीची धांदल सुरू असताना रमेश सावस्कार हे…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीचे पडसाद आता देशातील धार्मिक स्थळांवरही उमटू लागले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतही गॅस टंचाईचा फटका बसला असून साईबाबा संस्थानने प्रसाद वितरणात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीत दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात लाडू प्रसाद तयार केला जातो. मात्र सध्या गॅस साठा मर्यादित असल्यामुळे इंधन बचतीसाठी संस्थानने प्रसाद वितरणाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट दिले जाणार आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात आला…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाटरोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, जहागीरदार वाडी येथील रेहान खान मंजूर खान (वय १९) या तरुणाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १५ फेब्रुवारीला दुपारी सुमारे १२.४० वाजता रेहान खान हा घाटरोड पोलीस चौकीच्या पाठीमागील गल्लीतून जात असताना जुन्या वादावरून मुफीद रेहमान मुजावर याने लोखंडी रॉडने तर मोहसीन मुजावर याने बांबूने त्याच्यावर पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात रेहान खान याच्या उजव्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे. दरम्यान, रेहानच्या…
जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दिलीप रामा सपकाळे (वय ५६, रा. सिद्धार्थ नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना १२ मार्च रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी दिलीप सपकाळे हे पत्नी व मुलासह राहत होते. दि. १२ रोजी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. कालसिंग बारेला करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी ऑक्सिजन आणि केमिकलसह औद्योगिक साहित्य वाहून नेणाऱ्या मिनी ट्रकला भीषण आग लागून तीनवेळा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही थरारक घटना तालुक्यातील भुसावळ-जामनेर मार्गावर कुन्हे पानाचे गावाजवळ शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजता घडली. दरम्यान, ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालक उमेश रमेश जाधव (रा. हातनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ ट्रकमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचविला. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी ट्रक (क्र. एमएच २० ईएल ८४६७) हा औद्योगिक साहित्य, सिलिंडर तसेच इतर साहित्य घेऊन जात…
आजचे राशीभविष्य दि.१४ मार्च २०२६ मेष राशी आज तुमच्या व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त नफा होईल. नवविवाहित जोडप्यांमध्ये आनंददायी गप्पा होतील, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले निकाल दिसतील. वृषभ राशी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्याभोवती असेल. लोक तुमच्या वागण्याने खूश होतील. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यावसायिक गटासोबत भागीदारी करण्याचा विचार कराल. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजात आदर वाढेल आणि लोक तुमच्या सर्जनशीलतेची प्रशंसा करतील. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची…

