जळगाव : प्रतिनिधी १८ वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरात राहणारी १८ वर्षीय पीडित तरुणी आणि संशयित आरोपी हुजेफा युनुस पिंजारी (वय १९, रा. चाळीसगाव रोड, धुळे) यांची ओळख होती. १९ नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने पीडित तरुणीचे काही खासगी अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये मिळवले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर दबाव निर्माण केला. दिलेल्या तक्रारीनुसार, बाथरूममधील पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावी किंवा झाकून ठेवावी. तसेच वादळी वारे, पावसामुळे आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे…
मुंबई : वृत्तसंस्था इराण-इस्रायल युद्धाच्या थेट परिणामामुळे महाराष्ट्रात गॅस पुरवठ्यावर गंभीर तणाव निर्माण झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्व शहरांत स्वयंपाकासाठी गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. नागरिक गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगेत उभे राहत आहेत, तर हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व लहान खाद्यव्यवसायिक व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक प्रमुख शहरांत गॅस पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन व फोनद्वारे सिलिंडर बुकिंग केलेली असली तरी वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी नागरिक सकाळी एजन्सी उघडण्याआधीच रांगेत उभे राहतात. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. युद्ध सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम म्हणून देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश देत घरगुती वापरासाठी एलपीजीचा पुरवठा प्राधान्याने करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली आहे. या संदर्भात सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच येत्या १७ मार्चपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही न्यायालयाने…
अमळनेर : प्रतिनिधी शहरात येणाऱ्या गांजाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला असला तरी अनेक तरुण गांजा सेवन करून उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे राहुल गायकवाड व अमळनेरचे पो.नि. दत्तात्रय निकम यांनी संयुक्त कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. अमळनेर शहरात तरुण गांजा सेवनाकडे वळले असून भविष्यात गुन्हेगारीकडे वळतील, त्यामुळे वेळीच त्यांना आवर घालणे गरजेचे असल्याने एलसीबी व अमळनेर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त मोहीम राबवली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांचे कर्मचारी प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, तर अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय…
जळगाव : प्रतिनिधी पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या ६४ वर्षीय व्यावसायिकाचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी मोहाडी रस्त्यावरील पेट्रोल पपंपावर घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र रुढाभाई जैठवा (वय ६४, रा. रायसोनी नगर) यांचे शहरात किराणा दुकान आहे. ते बुधवारी दुपारी मोहाडी रस्त्यावरील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरत असताना त्यांना अचानक चक्कर येवुन ते खाली पडले. त्यांना नागरीकांनी उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुलगा वैभव याने जीएमसी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गफुर तडवी हे करीत आहे
जळगाव : प्रतिनिधी शहरातील स्टेडीयम लगत असलेल्या पोलीस लाईन समोरील व शहराच्या आमदारांच्या कार्यालयालगतचे फर्निचरचे दुकान चोरट्यांनी मंगळवारच्या रात्रीतून फोडले. चोरट्यांनी २२ हजाराची रोकड, ५ कुलर व स्टीलची सीडी लंपास केली आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ आनंदा नारखेडे (रा. नंदनवन कॉलनी, ख्वाजामिया दर्गाच्याच्या मागे) यांचे बेंडाळे कॉलेज लगतच्या शॉपिंग सेंटरमध्ये हर्षल एजन्सी नावाने फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ८ वाजता दुकान बंद करून ते व त्यांचा कर्मचारी घरी गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांच्या दुकानात काम करणारा संदीप पाटील (रा. ममुराबाद) हा कामगार घरून चाबी घेवून दुकान उघडण्यासाठी गेला…
आजचे राशिभविष्य दि.१३ मार्च २०२६ मेष राशी आज, तुमचा सामाजिक सहभाग वाढेल. तुम्हाला काही कामात अपेक्षित परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या वेळेचा चांगला वापर केल्याने तुमच्या कामात रस वाढेल. या राशीच्या महिला विशेषतः त्यांचे व्यक्तिमत्व वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील. त्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील. वृषभ राशी या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी देखील मिळतील. वैयक्तिक वचनबद्धतेमुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. सरकारी नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त काम आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्ही या जबाबदाऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण कराल. जुनी गुंतवणूक मॅच्युअर झाल्याने खात्यात मोठी रक्कम येऊ शकते.…
मुंबई : वृत्तसंस्था टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असून, लवकरच आयपीएलच्या रणसंग्रामात मैदानावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या पुढील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची तारीख आणि ठिकाणही स्पष्ट झाली आहे, ज्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला. या सामन्यात पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात संघाला विजेतेपद मिळवून दिले. भारतीय खेळाडू २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून,…
जम्मू : वृत्तसंस्था फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली असून सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विवाह सोहळ्याला फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. लग्न समारंभादरम्यान कमल सिंग जामवाल नावाच्या व्यक्तीने अचानक फारुख अब्दुल्लांच्या मागून येत त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखली आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. फुटेजमध्ये हल्लेखोर मागून येऊन बंदूक रोखताना दिसत असून त्याच…

