Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणाला संपविले !
    क्राईम

    धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणाला संपविले !

    editor deskBy editor deskJanuary 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशाच्या राजधानीत अनेक गुन्हेगारी घटना घडत असतात, अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर कुत्रा सोडला होता. नंतर शॉलने त्याचा गळा आवळून चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. क्रूरतेनं तरुणाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, समयपूर येथे गुरप्रीत आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होतं. मात्र मुलाच्या निधनामुळे आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी गुरप्रीत आणि त्याच्या दोन लहान बहिणी बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. बाजारात गेल्यावर तिथे एका तरुणाचा त्याला धक्का लागला. खांद्याला धक्का लागल्याने गुरप्रीत आणि त्या तरुणामध्ये वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्येही शिविगाळ सुरू झाली आणि नंतर दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले.

    हे सर्व पाहून गुरप्रीतच्या बहिणी घाबरल्या. त्यांनी ही भांडणे कशीबशी थांबवली आणि त्याला घरी नेलं. घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी बाजारात हाणामारी करणारा तरुण आपल्या मित्रांसह गुरप्रीतच्या घरी आला. बदला घेण्यासाठी त्याने घरातून गुरप्रीतला बाहेर कढलं. सुरुवातीला या तरुणांच्या टोळक्याने गुरप्रीतवर कुत्रा सोडला. त्यानंतर शॉलने त्याचा गळा आवळला. तसेच चाकूने त्यावर वार करत त्याची हत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेताली. गुरप्रीतचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केलीये.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.