Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे स्थानकाजवळ पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरच्या ठिकाणी गाळ काढताना क्रेनमध्ये उतरलेल्या विजेचा शॉक लागल्याने एका १६ वर्षीय अल्पवयीन कामगार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली. इतर ४ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. सखाराम जिना बारेला (रा. गंगापूर, ता. जामने) असे मयत झालेल्या अल्पवयीन कामगार मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे विभागाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पावरा समाज बांधव हे काम करीत होते. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरजवळ असलेल्या टाकीमधून क्रेनच्या सहाय्याने गाळ काढला जात होता. यावेळी क्रेनमध्ये विद्युत प्रवाह उतरला व सखारामला जोरदार विजेचा झटका बसला. त्यामुळे त्याचा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील गोजोरे येथे एका तरुणाला घरातून शेतात बोलावून बहिणीचं नाव का घेतो, या कारणावरून बेदम मारहाण करीत, त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि.१६ सकाळी १० वाजता घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील विनोद गंभीर कोळी (वय २७) हा तरुण त्याचे आई, वडील, २ भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपी जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या गोरगावले बुद्रुक येथे दुचाकीवरून परत जाणारे आरोग्य कर्मचारी धर्मेंद्र विजय महाजन (५६) यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार धर्मेंद्र महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता खडगाव जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथून शासकीय कामे आटोपून परत गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रात धर्मेंद्र महाजन हे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. मालवाहू वाहन ( क्रमांक एमएच १९-सीवाय ४८९८) याचा धक्का महाजन यांच्या दुचाकीला लागला. याबाबत जितेंद्र विजय महाजन (रा. चहार्डी, ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला मालवाहू वाहनाचा चालक जालिंदर मंगल पाटील (वय २९, रा. विरवाडे, ता. चोपडा)…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील ड्रीम हॉटेल जवळ ही घटना घडली आहे. एका चारचाकीने काही तरुण भरधाव वेगाने समोर येत होते. त्यावेळी अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी महामार्गालगत असलेल्या टेकडीवर जावून आदळली. अपघातावेळी कार फार वेगात होती. त्यामुळे जागीच दोघांचा मृत्यू झाला. रवी शिवराम धापटे आणि पप्पू शिवराम भला (राहाणार शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच उज्जैन येथे गेलेल्या वृद्धाच्या घरात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना शहरातील कांचन नगरात घडली. याठिकाणाहून चोरट्याने मोबाईल आणि वायरलेस स्पीकर चोरून नेला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना शनीपेठ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर परिसरात संजय केशवराव मोहिते (वय ६१) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. देवदर्शनासाठी ते उज्जैन येथे गेले होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी ११ ते १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडाचे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझरखेडा, ता.भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना गुरुवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा कारखाना बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती आहे. सुमारे 50 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुजित कपाटे व सहकार्‍यांनी गुरुवारी रात्री बनावट दारूच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारखान्यातील बनावट दारूचा पुरवठा विदर्भात झाल्याची दाट शक्यता आहे. विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, राजकिरण सोनवणे, एएसआय आय.बी.बाविस्कर, जवान सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड, नंदू नन्नवरे यांच्या पथकाने छापा टाकला. यात बनावट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जळगाव शहरात गुरूवारी जाहीर सभा झाली. मात्र, या सभेला शहरातील पक्षाचे सात माजी नगरसेवक गैरहजर असल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात गुरुवारी रंगली होती. जळगाव लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगाव शहर तसेच ग्रामीण भागात तीन सभा घेतल्या. जळगाव शहरात झालेल्या सभेत शहरातील माजी महापौर नितीन लढा यांच्यासह सहा माजी नगरसेवक सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली. सभेचे नियोजन आणि यशस्वितेची जबाबदारी सुनील महाजन, विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील आणि शरद तायडे यांच्यासह जयश्री महाजन, ज्योती तायडे, राखी सोनवणे, प्रशांत…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसापूर्वीच एका माजी नगरसेवकावर गोळीबार करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवार गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बचावल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. पारनेर शहरातील एका हॉटेल नजीक हा प्रकार घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र गावठी कट्ट्यातून गोळी झाडता न आल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळले. या घटनेनंतर पठारेंनी व अन्य काही जणांनी संबंधितास पकडले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले…

Read More

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या गेल्या काही महिन्यापासून नेहमीच अडचणी वाढत असतांना आणखी एक अडचण वाढली आहे. पक्षाला लागलेली गळती निवडणुकीच्या तोंडावरही कायम आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर आता स्थानिक नेतेही पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हिंगोली लोकसभेचे संघटक व शिवसेनेचे नेते डॉ. बीडी चव्हाण आज शिवसेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या बी. डी. चव्हाण यांच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील महामार्गावर तेली पेट्रोल पंपाच्या परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. सुमारे काही किलोमीटरपर्यंत दुचाकी फरपटत नेली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मृतांची नावे जितेंद्र सावजी राठोड (वय ३४, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) व त्याचा मित्र प्रकाश उखा तोवर (रा. डोहरीतांडा, ता. जामनेर) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दवाखान्याच्या कामानिमित्त हे दोघे दुचाकीवरून वरणगावकडून भुसावळकडे येत असताना ट्रक (आर जे ११ जीए ९९०३) ने जोरदार धडक दिली. ट्रकने सुमारे एक या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. बुधवारी दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक श्यामबाबू (पूर्ण नाव…

Read More