Author: editor desk

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४ विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याचे नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, एन. एन. वाघ दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ,…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २७ रोजी सकाळी उघडकीस आली. इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समृद्धी पार्क अपार्टमेंटमधील मंडलेचा परिवार वास्तव्यास असून इदांत हा सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस सी. स्कूलमध्ये बारावीत शिकत होता. त्याने बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला आणि २७ रोजी त्याचा रसायनशास्त्राचा पेपर होता. मात्र, इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची पोलिस डायरीत नोंद आहे. मध्यरात्री एक वाजता इदांतच्या आईने त्याला कॉफी करून दिली होती. त्यानंतर त्याने सकाळी सहा वाजता अभ्यास करण्यासाठी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचार व विनयभंगाच्या अनेक घटना घडत असताना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे आरोपीच्या घरी घडला आहे. याबाबत विमाननगर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.25) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण चिजवाणी (वय-35 रा. गोल्डकोस्ट सोसायटी, मुंजाबावस्ती, धानोरी) याच्या विरोधात आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

पुणे : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याने अनेक पक्षाकडून मतदार संघात उमेदवार चाचपणी करण्याचे काम सुरु असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मंगळवार, २७ फेब्रुवारी शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत. अशातच मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला कार्यालयामध्ये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील व सरकारमध्ये आता पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरु झाले असून त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, सरकार कोणालाही खुश करण्यासाठी खोटे आश्वासन देणार नाही. नोटिफिकेशनचा प्रश्न तुमच्या सर्वांच्या समोर आहे. त्यावर सहा लाख अक्षेप आले आहेत. त्यामुळे कोणालाही खुश करण्यासाठी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणार नसल्याचे देखील मुख्यमंत्री म्हंटले आहे. मनोज जरांगे पाटील यांची भाषा योग्य नाही. हे करा, ते करा, ही भाषा योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आरक्षण टीकरणार…

Read More

पुणे : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात छोट्या मोठ्या कारणाने भांडण होत असतात, नुकतेच पुणे शहरात देखील एका परिवारात अशीच भांडणाची सुरुवात झाली मात्र हे भांडण इतक्या टोकाला गेले कि थेट पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील पत्र्याच्या चाळीत घडला आहे. याबाबत जखमी रमेश बबन ससाणे (वय-43 रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जया रमेश ससाणे (वय-34 रा. भवानी पेठ, पुणे) हिच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था ‘सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी,’ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. दोघेही एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यात खेळीमेळीत संभाषण झाले. यातील एका संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी आरक्षणाच्या फडणवीस व सरकारमधील मंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण सध्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे-पाटील यांच्या दिशेने का? अशी चर्चाही…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी लग्न समारंभात महिलेची पर्स व कपड्याची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरातील जारगाव चौफुलीवरील रामदेवबाबा मंगल कार्यालयात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी रोजी भाचीच्या लग्नाला आलेल्या सुशांत वाल्मिक पाटील (एकविरा नगर, भडगाव) हे पत्नीसह कार्यालयात वधूच्या स्वतंत्र खोलीत बॅगा ठेवून कार्याचा आंनद घेत होते. वधूच्या बिदाईसाठी तयारी करण्यात मग्न असलेल्या मामीच्या ठेवलेल्या बॅग व पर्सवर पाळत ठेवत चोरट्यांनी पर्स व कपड्याची बॅग लंपास केली. पर्समधील मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने, ५ साड्या असे २० रोख रक्कम एकूण ७३ हजारच्या ६३ हजार किमतीचे दागिने व १० हजार ऐवजाची चोरी झाली आहे. सीसीटीव्ही तपासणी केली असता २ युवक रेकी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा ‘रुममेट’ शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतना नुकतेच फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयासमोर असलेल्या महालक्ष्मी सुपर शॉप मध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील वस्तू व एक लाखाची रोकड असा १,९०,७९५ रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि. २४ च्या मध्यरात्री घडली. मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या मॉलमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी नाना महाविद्यालयासमोर नीलेश राणे यांच्या मालकीचे महालक्ष्मी सुपर शॉप असून दि.२४ च्या मध्यरात्री सुपर शॉप शेजारी असलेल्या गुरुनानक कापड दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून दोन्ही दुकानाच्या मध्ये असलेला पत्रा वाकवून सुपर शॉपमध्ये प्रवेश करीत तेथील एक लाख ९०० रुपयाची रोख रक्कम,…

Read More