जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा हुडको परिसरात एका तरुणाला तीन जणांनी चाकूने वार करून दुखापत केली. ही घटना रविवार ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी सोमवार, ४ मार्च रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील पप्पू शिरसाठ हे रविवार ३ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उभे असताना तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत चाकूने वार करून त्यांना जखमी केले. जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवार, ४ मार्च रोजी पप्पू शिरसाठ यांच्या पत्नी पूजा शिरसाठ यांनी फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मोहाडी रोडवरील शासकीय महिला रुग्णालयाच्या परिसरातून विविध प्रकारचा एक लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवार, ४ मार्च रोजी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी रोडवरील शासकीय महिला रुग्णालय परिसरातून २ ते ४ मार्चच्या दरम्यान चोरट्यांनी इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, इलेक्ट्रिक केबल चोरून नेल्या. एक लाख २७ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. आयुष मणियार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों रामकृष्ण पाटील करीत आहेत
जळगाव : प्रतिनिधी पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात मर्जीप्रमाणे शपथपत्र लिहून देण्यासाठी अॅड.पीयूष नरेंद्र पाटील (रा. दीक्षितवाडी) यांचे अपहरण करून त्यांच्या काकासह अन्य जणांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली तसेच खिशातील आठ ते नऊ हजार रुपये काढून घेतले. ही घटना २८ डिसेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान दीक्षितवाडीत घडली. या प्रकरणी ४ मार्च रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन काकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून अॅड. पीयूष पाटील यांनी यापूर्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याविषयी आम्ही सांगू त्याप्रमाणे शपथपत्र दे या मागणीसाठी त्यांचे काका संजय भास्कर पाटील,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मायक्कादेवी मंदिराजवळ गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या विनोद भीमराव शिंदे (४९, रा. वहीं ता. चोपडा) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३ किलो १२१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी करण्यात आली. शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, संशय येऊ नये म्हणून विक्री करणाऱ्याने हा गांजा ‘स्कूल बॅग’मध्ये आणला होता. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पोउनि योगेश ढिकले, पोकों राहुल पाटील, राहुल घेटे, शशिकांत पाटील यांनी विनोद शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २४ हजार ९६८ रुपये किमतीचा तीन किलो १२१ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. पुढील तपास…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील महेशनगरात माईंड केअरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भुसावळ येथील पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी छापा टाकून विशाल बहाटे व पल्लवी बहाटे या दाम्पत्याला अटक केली. या दाम्पत्याला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील उच्चभ्रू महेशनगरातील एका बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापेमारी करत पाच तरुणींची सुटका केली होती. यावेळी दोन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर भागांतील पाच तरुणींना देहविक्रीसाठी प्रोत्साहित करून त्यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहील. आज तुम्हाला मित्रांचं प्रचंड सहकार्य मिळेल. तुमच्या मित्र आणि सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्या कार्याची कदर होईल. तुमचा आज मान सन्मान होईल. अध्यात्मिक कार्यातही तुम्ही भाग घ्याल. धार्मिक कार्यातही प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. वृषभ आजच्या दिवशी जपून पावलं टाका. आवश्यक कामांचा निपटारा करा. महत्त्वाच्या कामांवर फोकस ठेवा. आजच्या दिवशी अनोळखी लोकांपासून सावध राहा. त्यांच्यावर पटकन विश्वास टाकू नका. जर तुम्ही आज प्रवास करणार असाल तर तुम्हाला अडचणी येतील. नव्या लोकांची ओळख होईल. विश्वासू लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. आईवडिलांच्या आशीर्वादाने नवं घर किंवा…
जळगाव : प्रतिनिधी जगातील पाचवी अर्थव्यावस्था करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून गरिबांना गेल्या दहा वर्षांत गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचे काम करून गरिबांचा विकास केला. नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या . अर्थव्यवस्थेला आता कुणी थांबवू शकत नाही. विकास पाहून विदेशातून आलेली नागरिक तोंडात बोटे घालत आहे मुंबई आणि पुणे विमानतळासारखी सुसज्ज रेल्वे स्थानक बनली आहेत. नरेंद्र मोदी यांनी जगातल्या १०० देशाना कोरोना लस पुरविली . येत्या पाच वर्षात विकासाची गाडी वेगात जाणार आहे. भारताला सर्वोच्च शिखरावर पोहचण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱयांदा पंतप्रधान करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केले. प्रदेशाध्यक्ष…
धरणगाव : प्रतिनिधी सिंचन हा शेतीचा आत्मा असून सिंचनाचे क्षेत्र वाढले तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट होतो. त्यांचे जीवनमान उंचावत असते. विजेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कामांना आम्ही प्राधान्य दिले असून गावातील तरुणांना व्यायामासाठी लवकरच साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील बोराणार येथे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण व साठवण बंधाऱ्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 3 कोटी निधीच्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण ! पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…
जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त श्रीमती गायकवाड यांनीही स्वागत केले.
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील मालखेडा येथील प्रगतीशील शेतकरी सुनील गंगाराम पाटील यांना नुकताच सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2022-23 या वर्षासाठी एरंडोल तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने मालखेडा गावाचे प्रगतिशील शेतकरी व जैविक शेतीचे प्रणेते सुनील गंगाराम पाटील यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याबद्दल सुनील पाटील यांचे कृषी अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

