Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरी कुणीही नसताना १७ वर्षीय मुलीने संपविली जीवनयात्रा
    क्राईम

    घरी कुणीही नसताना १७ वर्षीय मुलीने संपविली जीवनयात्रा

    editor deskBy editor deskFebruary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तंजीला बी. शेख अन्सार (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तंजीला आपल्या आई, वडील व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले. होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या भावाकडे (मुलीच्या मामाकडे) गेली होती. घरात कोणी नसल्याने तंजीलाने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ३ वाजता आई घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने, खिडकीतून डोकावून पाहताच आईला तंजीलाने गळफास घेतलेला दिसला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून तंजीलाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.