मेष आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल होऊ शकतात. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता.एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल. नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहितांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. शिक्षणाशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, वैद्यकीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळू शकेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळाल्याने तुमचा बँक बॅलन्स मजबूत होईल. गरज पडल्यास भावंडांची मदत घ्याल. मिथुन आजचा दिवस छान जाईल. काही चांगल्या…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना मिळणारे ६५०० हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. यासाठी पोलीस पाटील संघटनांच्या वतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले, अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या. अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश…
चोपडा : प्रतिनिधी शहरापासून तीस किमीवरील सातपुड्यातील मेलाणे गावात सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्याची घटना उघडकीस आली. हि कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुणही दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मेलाणे गावात सव्वा एकर शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दुपारी शेतात धाड टाकून त्यात त्यांना…
मुंबई : वृत्तसंस्था भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या भाजप प्रवेशामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आदिवासी समाजाच्या मतांसाठी एकीकडे राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाला कालच्या मेळाव्यात साद घातलेले असतानाच एक आदिवासी नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे.मुंबईमध्ये पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वळवी यांच्यासोबतच…
जळगाव : प्रतिनिधी बंजारा स्पोर्ट फाउंडेशन संचलित बंजारा प्रीमियर लीगतर्फे समस्त बंजारा समाज एकत्र यावा या उद्देशाने समाजातील युवकांसाठी युवकांतर्फे तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सागर पार्क मैदान येथे घेण्यात आली. या स्पर्धेत सेवालाल संघाने विजेतेपद पटकावले आहे. ८ मार्च रोजी स्पर्धेचे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच समाजातर्फे महिलांना सन्मान देण्यासाठी दोन महिला युवतींना पुरुष संघ मध्ये स्थान देण्यात आले. हे तिसरे वर्ष असून, यावर्षी ८ संघ आपल्या संघ मालकांसह सहभागी झाले होते. यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुख्य प्रायोजक रमेश चव्हाण, सह प्रायोजक, शैलेश पवार, आरती पवार, सह प्रायोजक…
जळगाव : प्रतिनिधी मजुरी काम करुन घराकडे निघालेल्या दोन भावंडांना रिक्षातून आलेल्या दोघांन अडविले. तसेच त्यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये जबरीने काढून घेतल लुटले. ही घटना सोमवारी रात्री साडेबारावाजेच्या सुमारास शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\ मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रायपुर येथील निलेश रामलाल शिलाले व त्याचा भाऊ शिवा रामालाल शिलाले है वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार दि. १० मार्च रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास निलेश आणि शिचा हे दोन्ही भाऊ घरी जाण्यासाठी निघाले असता, खेडी पेट्रोलपंपाजवळ एका रिक्षात आलेल्या दोनजणांनी त्यांचा रस्ता…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरातील गौरव भरत कुंवर (चय २४) या तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली, तसेच यातील तरुणाने लोखंडी फायटर तोंडावर मारुन तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० रोजी कासमवाडी परिसरातील कब्रस्तानच्या गेटजवळ घडली, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अष्टभुजा मंदिराजवळ गौरव भरत कुंवर हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तो कब्रस्तानच्या गेटजवळ गौरव कुंवर हा जात असतांना त्याला जयंत वाणी, लखा वाणी व विशाल साळुंखे सर्व रा, कासमवाडी गांनी शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विशाल साळुंखे वाने लोखंडी फायटर…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणान्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे, याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार दि. १० मार्च रोजी पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर सोमवार ११ मार्च रोजी दुपारी तिच्या नातेवाईकांनी…
जळगाव : प्रतिनिधी वर्दळीचा रस्ता असलेल्या सुमारे शंभर फुट उंच असलेल्या बांभोरी पुलावरुन नदीपात्रात उडी घेत ज्ञानेश्वर गोंविदा नन्नवरे (कोळी) (वय ४५, रा. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बांभोरी गावात ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेतमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घराबाहेर पडल्यानंतर ते गावाजवळच असलेल्या गिरणा नदीवरील गेले. याठिकाणी सुमारे शंभरफुट उंच असलेल्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रात पाणी नसल्यामुळे त्याठिकाणावरील…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीतील व्ही- सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना सरस्वती गोविंदा ठाकरे (वय- ३५, रा. सुहागी ता.खालवा जि. खंडवा ह.मु. जळगाव) या मजूर महिलेचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहिता पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील मुकेश अॅग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत असून तेथेच वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे मंगळवारी रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या, त्यावेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा…

