Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी : ९ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू
    क्राईम

    दुर्देवी : ९ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

    editor deskBy editor deskMay 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील मेहरूण तलाव शिवारात एका इमारतीच्या ठिकाणी सेंट्रिंग काम करत असताना, अचानक ९ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९:३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    सविस्तर वृत्त असे कि, बंडू वना सोनवणे (वय ५२, रा. आसोदा रोड, गुरुदत्त कॉलनी), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रिंगचे काम करत होते. मेहरूण तलाव शिवारात एका इमारतीचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता इमारतीच्या नवव्या मजल्यावर बंडू सोनवणे हे सेंट्रिंगचे काम करत होते. हे काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट नवव्या मजल्यावरून खाली पडले. याठिकाणी असलेल्या इतर मजूर व नातेवाइकांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन विवाहित मुली आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.