Author: editor desk

यावल : प्रतिनिधी किनगाव परिसरात ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर एका हॉटेलसमोर टरबूज घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हे वाहन उलटले. मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.१९ घेऊन चालक सीवाय ९५९८ वाहन गणेश गोपाल चौधरी (रा. विवरे बु, ता. रावेर) चोपड्याकडून यावलकडे येत सीम (ता. यावल होते. त्यात सावखेडा ) येथील मजूर होते. वाहन किनगाव येथे थांबवले. हे मजूर वाहनातून खाली उतरत असताना वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले. आणि वाहन उलटले. यात सुदैवाने मजूर तातडीने खाली उतरले. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. चालक गणेश चौधरी यांनी माहिती दिल्यानुसार यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अटक केली. ही कारवाई पांडुरंग टॉकीजजवळ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रणजित किशोर चंडाले (वय ३७, वाल्मीकनगर, भुसावळ), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहे. कॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश – चौधरी, सचिन चौधरी, जावेद शहा,राहुल वानखेडे, भूषण चौधरी यांनी – केली. याप्रकरणी कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. जे काम हाती घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे आशेने पाहिले जाईल. तुमचे कनिष्ठ देखील तुमच्या कामाचे, क्षमतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. कोणतीही घाई करू नका. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. तुमचा व्यवसाय वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घ्याल. वृषभ आज तुमचा दिवस चांगला जाईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. ज्यातून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कामामुळे जास्त व्यस्त असाल. कुटुंबासाठी वेळ काढण्यात अडचणी येतील. याचा तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. यात, धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. तर, जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. जळगावच्या मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचीही बदली झाली असून त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. अंकित गेल्या ९ महिन्यांपूर्वीच जळगाव जि.प.त रूजू झाले होते. आठवड्यापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांचे आदेश जळगाव जि. प. ला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाला आहे. विद्या गायकवाड यांची बदली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यात एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला शेतात नेवून लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपी नाना बारकू सोनवणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे .

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनी पेठ पोलिसांनी कांचन नगर परिसरात लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता पाठलाग करून संशयित आरोपी गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय-२५) याला अटक करत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचन नगर भागात दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे हा कमरेला कोयता लावून दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता पथकाने कारवाई करत संशयित आरोपी गणेश…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी बाबत महाविकास आघाडी कडून जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा सुटलेली आहे. मात्र उमेदवार मिळत नसल्याने अजूनही उमेदवारीच्या शोधात शिवसेना असून आता रमेश माणिक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून शिवसेना निवडणूक लढवीत आहे. या निवडणुकीसाठी आधी ललिता पाटील कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अजूनही शिवसेनेकडून उमेदवारी कोणाला मिळेल दिले जाईल याबाबत स्पष्ट झालेले नसून भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार देण्याबाबत शिवसेना कडून अजूनही शोध सुरूच आहे. मुंबई येथे उमेदवारी बाबत घडामोडी घडत असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख हे देखील जळगाव आज येण्याची शक्यता आहे.…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था सातबारा उतार्‍यावर फेरफार नोंद घेण्यासाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच घेताना चांदवड तालुक्यातील कुंदलगाव, व सजा शिंगवे तलाठ्याला नाशिक एसीबीने अटक केली. विजय राजेंद्र जाधव (33, श्रमसाफल्य कॉलनी, प्लॉट नंबर 11, वडेल रोड, वलवाडी, देवपूर, धुळे) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरूष तक्रारदार यांच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव, ता.चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे. कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव, ता.चांदवड येथील गट नंबर 410, 412, 414 या गटातील 50-50 गुंठे जमिनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबार्‍याला फेरफार नोंद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक १८ मार्च २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या IQAC कक्षाद्वारे जळगाव शहरातील कला, वाणिज्य, विज्ञान, महाविद्यालयातील सर्व शिक्षकांकरिता नव्याने लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या यशस्वी अंमलबाजवणी करीता एक दिवसीय परिसंवाद आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उदघाटन डॉ. भरत अमळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. दीपक दलाल, प्रा. पवित्रा पाटील (सदस्य, व्यवस्थापन परिषद), श्री. प्रमोद बऱ्हाटे (संपादक, साईमत), श्री. संजय शाह (Member, CAIT), प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. पी. आर. चौधरी (सचिव, धनाजी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर होताच देशात आचार संहिता लागू झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे देखील रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार आहेत. मनसेकडून लोकसभेसाठी २ जागांची मागणी केली गेली आहे. या जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्ली गाठलीय. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी राजकीय पक्षांची तयारी मात्र अजूनही अपूर्ण आहे. अनेक आघाड्याच्या जागावाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. जागावाटपाचा तिढा सुटून उमेदवारांना प्रचाराचा पुरेसा वेळ मिळावा, यासाठी राजकीय पक्षांकडून बैठकांचा सपाटा चालू आहे. यात भाजपही मागे नसून दिल्लीत बैठका सत्र गेल्या काही दिवसांपासून सलग चालू आहे. आजही भाजपने जागवाटपाच्या निर्णयासाठी बैठक बोलवली आहे. आजच्या…

Read More