Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलाच्या वाढदिवशी पित्याने संपविली जीवनयात्रा
    क्राईम

    मुलाच्या वाढदिवशी पित्याने संपविली जीवनयात्रा

    editor deskBy editor deskMay 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर पित्याने दुसऱ्या दिवशी घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता शहरातील गणेशनगर भागात घडली. अमित नंदलाल कटारिया (वय ३२, रा. आदर्शनगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, अमित दोन महिन्यांपूर्वीच आदर्शनगरात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा सन्मित यांच्यासह राहायला आला होता. महात्मा फुले मार्केट येथे ‘चुनरी कलेक्शन’ नावाने त्याचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा केला. गुरुवारी फुले मार्केटमधील दुकानातून अमित गणेशनगरमधील आपल्या आईच्या घरी गेला. वरच्या मजल्यावर आराम करण्यासाठी जात असल्याचे अमितने आईला सांगितले. बराच वेळ झाल्यानंतर आई अमितला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता तो पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आईने आक्रोश केल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जीएमसीत हलविला. त्या ठिकाणी डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमित मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.