• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

editor desk by editor desk
February 21, 2024
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरेंनी केले मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शत्रूत्व सर्वश्रूत आहे. पण आता ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनात कोणतीही आढी न ठेवता थेट मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत. यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे लवकरच शिंदेंच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यातच ठाकरेंनी शिंदेंचे आभार मानले आहेत हे विशेष.

मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण दिल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मी याक्षणी राजकारणावर फार बोलणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याचे सांगितले आहे. त्याविषयी मी त्यांना धन्यवाद देतो. आता एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेता हे आरक्षण काद्याच्या सर्व कसोट्यांवर टिकेल. त्यातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो, असे ते म्हणाले.
मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर करण्यात आले त्यावरून हा कायदा सर्वच निकषांवर टिकेल असा मला विश्वास आहे. सभागृहात याविषयी समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. सरकारने शिक्षण व नोकऱ्यांत हे आरक्षण दिले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हे अधिक स्पष्ट होईल. पण आता तातडीने मराठा समाजातील किती तरुणांना किती नोकरी मिळेल हे सरकारने सांगितले तर सोन्याहून पिवळे होईल, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठा समाजाचेही कौतुक केले. मराठा समाजाने एवढा मोठा लढा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. सरकारने हा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या प्रामाणिकतेवर मी शंका घेत नाही. पण त्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. मी स्वतः मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात गेलो होतो. तिथे आंदोलकांवर अत्यंत निर्घृण व निर्दयीपणे अत्याचार करण्यात आला होता. त्यांची डोकी फोडण्यात आली होती. या कारवाईची काहीच गरज नव्हती. हा विषय शांततेत सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Previous Post

राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत संजय पवार, भाजपचे रोहित निकम बिनविरोध

Next Post

चिंताजनक : उपवासाचे फराळ खाल्ल्याने ५०० भाविकांना विषबाधा

Next Post
चिंताजनक : उपवासाचे फराळ खाल्ल्याने ५०० भाविकांना विषबाधा

चिंताजनक : उपवासाचे फराळ खाल्ल्याने ५०० भाविकांना विषबाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !
क्राईम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !

July 18, 2025
“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !
राजकारण

“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !

July 18, 2025
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
राजकारण

विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !

July 18, 2025
व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद
क्राईम

व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp