Author: editor desk

यावल : प्रतिनिधी अंजाळे गावाजवळ मोर नदी पात्रात पुलाखालून जेसीबीच्या सहाय्याने गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर यावल पोलिसांनी कारवाई केली. त्यात एक जेसीबी, तीन डंपर आणि एक ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी यावल पोलिस आणि विशेष पथकाला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. सविस्तर वृत्त असे कि, त्यात अंजाळे येथील मोर नदीच्या पुलाखाली मंगळवारी सकाळी १० वाजता यावल पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार अनिल इंगळे, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर, वासुदेव मराठे यांनी ही…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था सातपुड्याच्या दुर्गम भागात अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते गमण दरम्यान पिकअप व्हॅन नदीत कोसळून दोन ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात १५ रोजी सकाळी झाला. मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी गमण येथे जात असताना हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात राजू ओंकार बारेला (३०, रा. कर्जाना ता. चोपडा जि. जळगाव), पोपट दत्तू ससाणे (४०, रा. नाशिक) हे दोघे जागीच ठार झाले. ज्ञानेश्वर उत्तम वाघ (रा. कुंझर ता. चाळीसगाव जि. जळगाव), सुनील बड्या पावरा (रा. खर्डी खुर्द ता. धडगाव), वाहनचालक कैलास सुरेश पाटील (३८, रा. ध्रुवनगर, नाशिक) हे जखमी झाले. दुर्गम भागात सध्या खासगी दूरसंचार…

Read More

मेष आज कौटुंबिक आनंद वाढेल. तुमच्या आधीपासूनच्या समस्यांचे समाधान मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन करता येईल. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी तुम्ही चांगला आहार घ्यावा. तुमच्या वागण्यात काही चांगल्या बदलांमुळे तुम्ही काही नवीन मित्र बनवू शकता. त्यांच्याशी बोलण्यात तुम्हाला मजा येईल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती समस्या आज संपुष्टात येतील. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस अनुकूल राहील. महिलांसाठी दिवस उत्तम राहील. व्यावसायिक आज महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. आज तुम्हाला एखाद्याच्या कर्जापासून मुक्ती मिळेल, तुम्हाला आराम वाटेल. मिथुन आजचा…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतांना बुलढाणा शहरातून देखील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिरवणुकीत नाचत असताना एका तरुणाची हत्या करण्यात आलीये. मिरवणुकीमध्येच या तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरलंय. आशुतोष संजय पडघान (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी खूनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातून १४ एप्रिल रोजी भीम जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नाचण्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाल्याने आरोपींनी मृतक आशुतोषला ओढत नेत…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बारामती लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी हि निवडणूक अधिकच रोचक बनत चाललीय. बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चुरशीची असते. यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतलाय. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतलाय. बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच…

Read More

चाळीसगाव :- प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी नाही तर माझ्या खानदेशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे. चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ती जेवण करून कुटुंबासह झोपली होती. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही बाबत १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता उघउकीला आले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज झाले होते, तर नुकतेच भुसावळ येथे माजी आ.संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा सुद्धा झाला असून याच मेळाव्यात माजी आ.चौधरी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. २१ रोजी मी त्यांना भेटेल, त्यांनी सध्या दिलेला उमेदवार बदलला नाही तरी आपण २४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत माजी आमदार संतोष चौधरींनी बंडाचे निशाण फडकावले. चौधरी म्हणाले की, पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनीच आपल्याला उमेदवारी करण्याबाबत विचारणा केली होती. आपण आदेश द्याल तर निवडणूक लढू, असे त्यांना सांगितले. यानंतर पक्षाकडे…

Read More

धुळे : वृत्तसंस्था घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री यांना देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या साक्री पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला धुळे एसीबीने अटक केली. परेश प्रदीपराव शिंदे (34) असे लाचखोराचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, 40 वर्षीय तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना सदर योजनेंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरीता आरोपी शिंदे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती, साक्री येथे सादर करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजारांची लाच सोमवारी मागितली व तक्रार…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन मुलांचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रोहन काशिनाथ श्रीखंडे (१७, रा. रामानंदनगर) आणि प्रथमेश शरद सोनवणे (१७, रा वाघनगर), अशी या मुलांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, हे दोघे जळगावहून दुपारी १ वाजता शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी आले होते. यानंतर ते समोरच असलेल्या तापी नदीत अंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही जण बुडाले. काही जणांनी त्यांना बाहेर काढले. लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Read More