Author: editor desk

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागेल. कौटुंबिक संबंध जपण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मोठे पद मिळू शकते. तुमच्या व्यवसायात काही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळत असल्याचे दिसते. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळात टाकणारा आहे. तुम्हाला कोणत्याही अनावश्यक वादात पडणे टाळावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामावर तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल. तुमचा पगार वाढू शकतो. तुम्हाला कोणत्याही चुकीच्या गोष्टीला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, रोहिदास सुभाष पाटील वय-५२, रा. चोपडाई ता. अमळनेर हे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे २९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते त्यांच्या चोपडाई शिवारातील शेतात काम करत असतांना काहीही कारण नसताना निशांत ज्ञानेश्वर पाटील, प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी रामदास पाटील आणि गोकुळ रामदास पाटील सर्व रा. नाव्हरी ता. अमळनेर या चार जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नांदूर शिंगोटे पुणे येथून नाशिककडे येत असलेल्या खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून दहा ते पंधरा फूट कोसळून अपघात झाला. यामध्ये १ ठार, तर ३३ प्रवासी जखमी झाले. सविस्तर वृत्त असे कि,  सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा परिसरात रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृताचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५, रा. अहमदाबाद) असे आहे.पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास १:०० वाजता पुण्याहून नाशिककडे जात होती. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाच्या लोखंडी अँगलल धडकून दोन…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कनाशी येथे दि.१३ च्या मध्यरात्रीनंतर ४ ते ५ अज्ञात – चोरट्यांनी चार घरे फोडत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली. एकाच रात्रीत चार घरांमध्ये घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कनाशी येथील कजगाव-कनाशी मार्गावर तीन घरे तर तेथून काही – अंतरावर असलेले एक घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात एका घरातील -महिलेस गेटचे कुलूप तोडत असताना आवाज आल्याने ती जागी झाली चोरट्यांना पाहून तिने आरडाओरडा करू लागताच या महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावले. याच घरातील एकावर टॉमी रोखत चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या घरात प्रवेश करत घरातील दोन सदस्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून त्यांना चोरट्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेची गर्दीचा फायदा घेत, सोन्याची पोत लांबवल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन ३० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना टॉवर परिसरात शनिवारी घडली. शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटल्याने ती दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पोत सराफाकडे नेण्यासाठी एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलगा तसेच एका तरुणीला सोबत घेत दुपारी टॉवर चौकात आले. सुरुवातीला त्या फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी नशिराबादजवळ उड्डाणपूल परिसरात भुसावळहून जळगाव येथे येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भुसावळ येथील कामगार तरुण ठार झाला आहे. ही दुर्घटना १३ रोजी दुपारी घडली. सविस्तर वृत्त असे कि, मडिया उर्फ मन्साराम भावसिंग बारेला (वय २४, रा. मलगाव जि. खरगोन, मध्य प्रदेश, ह.मु, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भुसावळ येथे आई, वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. बांधकामांवर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मडियाची पत्नी ६ महिन्यांची गर्भवती आहे. काही दिवसांनी घरात बाळ येणार म्हणून त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या घटनेने सारेच सुन्न झाले. शनिवार, दि. १३ एप्रिल रोजी…

Read More

मेष जवळचे नातेवाईक घरात येऊ शकतात. भेटवस्तूंची देवाणघेवाणही होणार आहे. बजेट बिघडू शकते, परंतु कौटुंबिक आनंदाच्या तुलनेत ते अद्याप नगण्य असेल. युवक आपल्या करिअरसाठी विशेष प्रयत्न करतील. वृषभ वैयक्तिक कामाशी निगडीत रूपरेषा तयार केल्याने तुम्ही व्यवस्थित दैनंदिन जीवनात यशस्वी व्हाल आणि समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमच्या क्षमतेची प्रशंसा होईल. विद्यार्थी आणि तरुणांनी केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळणार आहे. मिथुन ज्या कामासाठी तुम्ही काही काळ मेहनत करत आहात त्याचे अनुकूल परिणाम आज तुम्हाला मिळतील. यामुळे तुम्हाला खूप हलके आणि तणावमुक्त वाटेल. कोणत्याही प्रयत्नात यश मिळाल्यास तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. कर्क आज तुम्हाला स्वतःमध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि ऊर्जा जाणवेल. कोणतेही काम करण्यापूर्वी मनाचा आवाज…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपचा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीचा प्रसिध्द झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तसेच, भाजपचे अनेक मोठे नेतेही यावेळी उपस्थित होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आले आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेले आहे. याशिवाय, एससी/एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात अनेक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. तपासाअंती अधिक माहिती समोर येईल, सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरु आहे. सलमान खान घराबाहेरील…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील कात्रजमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कात्रज परिसरातील राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, कात्रज राजस सोसायटी चौकानजीक लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे. लहान मुलांसाठी याठिकाणी करमणूकसाठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाउस अशी साधने उभी करण्यात आली होती. काही प्रवेश फी आकारून लहान मुलांना करमणूकीसाठी लोक येथे येत होते. या पार्कमध्ये खेळायला आलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १३ एप्रिल) रात्री उशिरा घडली.…

Read More