Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पार्किंगमध्ये धुडगूस : टवाळखोरांनी कारवर लिहले अश्लील शब्द
    क्राईम

    पार्किंगमध्ये धुडगूस : टवाळखोरांनी कारवर लिहले अश्लील शब्द

    editor deskBy editor deskMarch 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबाची कार पार्किंगमध्ये उभी केलेली असताना तिच्यावर धारदार वस्तूने ओरखडल्याने कारचे नुकसान झाले आहे. यात कारवर धारदार वस्तूने अश्लील शब्दही लिहिले आहेत. हा प्रकार शुक्रवार, १५ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेनगर परिसरातील निखिल दीपक अग्रवाल हे पत्नीसह शहरातील एका चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार (एमएच १९, ईजी २३५५) पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री १०:१५ वाजता ते चित्रपट पाहून बाहेर आले असता, त्यांच्या चारचाकीच्या चहूबाजूने अज्ञात टवाळखोरांनी धारदार वस्तूने ओरखडे पाडले होते, तसेच अश्लील शब्दही लिहिलेले होते. याविषयी अग्रवाल यांनी सुरक्षारक्षकांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कुणीही सहकार्य करत नसल्याने अग्रवाल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.