Author: editor desk

जळगांव : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.20 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव बु .तालुका धरणगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंच रिक्त असलेल्या जागेवर पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील ,यांचे कट्टर समर्थक युवा सेनेचे उपजिल्हा संघटक भैय्या मराठे सर यांच्या मातोश्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली ,प्रसंगी उपस्थित सरपंच लक्ष्मण भिल ,ग्रामसेवक सी एस सोनवणे ,व सर्व ग्राम पंचायत सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते

Read More

जळगाव  : प्रतिनिधी बेरोजगारी, महागाई, अत्याचार, जाती-पातीच, जुमलेपणाच राजकारण याला आता जनता कंटाळली असून लोकांमध्ये त्यांच्या विषयी राग दिसून येत आहे. तुमच्या मनात असलेला हा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला १३ रोजी आहे. तुम्ही त्यांना अनेक वेळा संधी दिली. आता एक वेळा आम्हाला आणि आमच्या पक्षाला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील-पवार यांनी केले. महाविकास विकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा १९ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. उमेदवार जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवले त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मनापासून आभार मानत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत आहे. त्याचे नुकसान देखील महायुतीला होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाला…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील इंदिरानगर प्लॉट भागात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने पत्नीला चाकूने भोसकले. तसेच मुलीवरही चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास येथील नेहरू चौकात घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, किरकोळ कारणावरून येथील शिवा नारायण कोळी (वय ४०, इंदिरानगर प्लांट भाग, अडावद, ता. चोपडा) याने आज सकाळी पत्नी अनिता शिवा कोळी (३५) व मुलगी माधुरी शिवा कोळी (२१) यांच्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलगी माधुरी हिने दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात शिवा नारायण कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा याच्यासह सहा जणांवर एमपीडीएअंतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले. सविस्तर वृत्त असे कि, यामध्ये विशाल उर्फ विक्की मांडवा नामदेव सपकाळे (२८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (३०, रा. चोपडा), छायाबाई रमेश सकट (५८, रा. राजीवगांधी नगर) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वडिलधाऱ्यांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळू शकेल. जबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. मुले तुम्हाला काही चांगली बातमी देतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला निरोगी वाटेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मोदी सरकारने सत्तेचा उन्माद दाखवला आहे. मोदींकडून गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. पुण्यात आज खासदार अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मागील दहा वर्षात मोदींनी अनेक आश्वासने दिली. यामध्ये तरुण वर्गाला रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा आश्वासन होते. मात्र गेल्या दहा वर्षात देशात नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. देशभरातील तरुण वर्गापैकी 86% तरुण…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी (दि.१८) सकाळी ७.४५ च्या सुमारास ५५७.४ किमी अर्थातच सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकडून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरील (क्र.एमएच २० -जीटी ००९१) वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या साईड बॅरियरला तोडून दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या चारीमध्ये जाऊन पलटी झाली. वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१) मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६, सर्व रा.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, आगामी लोकसभा निवडणूकीच्या काळात शांतता व भयमुक्त वातावरण होण्यासाठी चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगार राहूल आण्णा जाधव, श्याम उर्फ आण्णा नारायण गवळी आणि हैदरअली आसीफअली सैय्यद तिघे रा.…

Read More