धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नाटेश्वर पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, भूषण भदाणे यांनी निवड केली आहे. आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसत्त्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामन्यापर्यंत पोहचवून पक्ष बळकटी करणार तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असा मला विश्वास आहे. त्यांच्या या निवडी बद्दल आपले हार्दिक अभिनंदनः !
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गांधी मार्केट जवळ एका तरूणाला चाकूने वार करून ४ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन चोरून नेली. ही घटना रविवारी दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोएब तस्लीम खान (वय २६ रा. पिंप्राळा हुडको) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्यास असून तो बांधकामचे काम करून उदरनिर्वाह करतो. रविवार दि. १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता तो कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे असलेला होता. त्यावेळी त्याला दोध्या उर्फ उमेश धोबी, भुषण (पुर्ण नाव माहित नाही)…
रावेर: प्रतिनिधी लगतच्या मध्य प्रदेशातील ब-हाणपूर येथून महाराष्ट्रात एक लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या पारोळा येथील एका वृद्धाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने येथे मुद्देमालासह पकडले. यातील आरोपीला अटक केली आहे. १६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हे. कॉ. ईश्वर चव्हाण, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. विशाल पाटील पो कॉ महेश मोगरे यांचे पथक गस्त घालत असताना रावेर शहरातील बसस्थानकात झाडाखाली बसलेला एक वृद्ध व्यक्ती पोलिस वाहन पाहताच दचकला. त्याची संशयास्पद हालचाल पाहताच त्याच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या रेक्झीनच्या गठ्ठयांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला १ लाख…
यावल : प्रतिनिधी शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेलिफोन ऑफिस समोरून दुचाकीने जाताना कारने धडक सेवानिवृत्त दिल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी १७ रोजी दुपारी झाला. अशोक किसन तायडे (६५, रा. आंबेडकरनगर, बोरावल गेट, यावल) हे दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून यावलकडे भरधाव जाणाऱ्या कारने (एम. एच. १४/ के. एफ. २१७०) धडक दिली. अनिकेत नारखेडे (रा. बुलढाणा) असे कारचालकाचे नाव आहे. या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यावल येथे सकाळी गुरुवारी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अमळनेर : प्रतिनिधी एमपीडीएमधून सुटून आल्यानंतर लागलीच शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालत पोटात चाकू मारला होता. जयवंत पाटील याला गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ला केल्यानंतर शुभम फरार झाला होता. तो अनेकदा शहरात आल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांच्या हातात लागत नव्हता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर याना शुभम देशमुख हा धुळे येथे मालेगाव रस्त्यावर खान्देश खानावळीत जेवण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने या हॉटेलमध्ये जाऊन दाऊद यास पकडले.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत सात घरे जळून खाक झाली. या भीषण आगीत चार शेळ्यांचा भाजून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सात शेतकऱ्यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव चौखंबे येथील एका घरात अचानक स्फोट झाला आणि आग लागली, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थ जमले असता त्याचवेळी बाजूलाच असलेल्या समाधान पाटील यांच्या घरातून घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. यामुळे आगीचे पुन्हा रौद्र रुप घेतले. जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, त्याचवेळी एका घरातील आणखी एका गॅस…
मेष आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे. आज तुमच्या सर्व समस्या क्षणार्धात दूर होतील. सरकारी कामात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पिकनिकला जाऊ शकता. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. ऑफिसमध्ये तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टसाठी तुमचे सर्वोत्तम मत द्याल, तुमचे बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. आधीपासूनच्या समस्यांचे समाधान मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनात आनंद येईल. कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन करता येईल. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वागण्यात काही चांगल्या बदलांमुळे तुम्ही काही नवीन मित्र बनवू शकता. मिथुन आजचा दिवस…
जळगाव : प्रतिनिधी येथील एमआयडीसीमधील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला बुधवार (दि.१७) रोजी सकाळी ९ वाजता भीषण आग लागली. या आगीत २० हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेले आहे. यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यामधील काही जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीत आज १७ रोजी सकाळी ९ वाजता केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची मात्र माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन…
जळगाव : प्रतिनिधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर…
अमळनेर : प्रतिनिधी प्रवासी आणि एसटी चालक-वाहकांचे भांडण सोडवायला गेलेल्या चालकांच्या तोंडावर लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांवर दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, समाधान भगवान लांडगे (चालक) हे नाशिक येथून बस घेऊन परत आल्यानंतर, त्यांना बसस्थानकात तीन पुरुष आणि दोन महिला या इतर वाहक आणि चालकांशी भांडण करताना दिसले. ते भांडण आवरायला गेले असता आनंदा नाना पाटील (अंतुर्ली), मोहित किसन वाघ व सारिका मोहित वाघ (दोन्ही रा. सीताराम नगर, उल्हासनगर), अनिल देवराम सोनवणे, मनीषा अनिल सोनवणे (अवधान, ता.…

