Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नाहाटा चौफुली परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजवणाऱ्या एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई केली. याप्रकरणी ७ मे रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाहाटा चौक परिसरात संशयित आरोपी आनंद विजय सारवान (वय २०, रा. अकलुद, ता. यावल) हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई करत संशयित आनंद विजय सारवान याच्याकडून सुरा हस्तगत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ऊरुस व संदल कार्यक्रमात झालेल्या वादातून बुधवारी पहाटे साडेतीन वाजता गेंदालाल मिल परिसरात सुमारास बाबूराव उर्फ भिकन शेख (रा. गेंदालाल मिल) याने हवेत दोन राऊंड फायर केले. या घटनेमुळे शहरात खळबळ माजून गेली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात नशिराबाद येथून गोळीबार करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मील परिसरात अली सैय्यद रज्जाक हे भंगार विक्रेता वास्तव्यास आहे. दि. ५ मे रोजी गेंदालाल मिलपरिसरात बाबा मौला अली मौला यांचा ऊरुस व संदलचा कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमात बॅनरवर अली सय्यद रज्जाक यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याच्या परिस्थिीतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात तेजनारायण सिंग व आरिफ अन्सारी हे दोघे जखमी झाले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी नशिराबादजवळील महामार्गावरील उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नांदेड येथील बाफना बिज जवळ तेजनारायण सिंग हे वास्तव्यास असून ते चालक म्हणून नोकरी करतात. दि. ७ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते आरिफ अन्सारी यांच्यासोबत (एमएच २०, जीबी ०५८१) क्रमांकाच्या वाहनाने जळगावकडून भुसावळकडे जात होते. यावेळी नशिराबाद उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने समोर चालणाऱ्या वाहनाला धडक दिली. या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील धरणगाव नाका येथे मंगळवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चार अज्ञातांनी आमच्याकडे रागात का बघतो, असे म्हणत चेतन सुभाष कानडे या तरुणावर गुप्ती आणि चाकूने वार केले. घटनेनंतर हल्ला करणारे चारही तरुण चारचाकी वाहनातून अडावदच्या दिशेने पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, सचिन सुधाकर सोनवणे, चेतन सुभाष कानडे, कमलाकर पाटील हे तिघेही धरणगाव नाक्यावर उभे असताना रात्री साधारण १०:३० वाजेदरम्यान समोर चार व्यक्ती आपसात भांडत होते. त्यातील एकजण दुसऱ्याला चाकूने मारण्याची भाषा करीत होता.त्याचवेळी तुम्ही आमच्याकडे का पाहता, असे म्हणत चारही शिवीगाळ करत जवळ आले. त्यातील एकाने कारमधून (जीजे ०५-आरक्यू २८१५) चाकू काढला आणि चेतन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथील एक कुटुंब ४ मे रोजी उन्हाळ्याचे दिवस असल्याने गच्चीवर झोपले असताना, रात्री चोरट्यांनी घरफोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नामदेव पंडित पाटील (६४) हे रायपूर येथील मराठी शाळेत सुरक्षारक्षकाचे काम करतात. ते शनिवारी ४ मे रोजी कुटुंबासोबत गच्चीवर झोपले होते. ५ मे रोजी सकाळी उठल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे त्यांना दिसले. घरात पाहणी केली असता, कपाट देखील फोडले होते. चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ३३ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, ३६ हजार रुपये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून व काहीतरी जादूटोणा केल्याच्या संशयावरून भडगाव पेठ येथील ७८ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना वरखेड (ता. भडगाव) येथे घटना घडली. संशयित आरोपीला पाच तासांतच जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सूपडू नाना पाटील (७८) हे परिसरात भगत म्हणून ओळखले जात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी लोकांचे येणे-जाणे होते. पेठ भागातील हितेश ऊर्फ कुणाल चुडामण मराठे (२४) हासुद्धा नेहमी येत असे. त्याच्यासोबत सर्वांची ओळख होती. कुणाल यास सुपडू यांनी मार्च महिन्यात उसनवारीने एक महिन्याच्या बोलीवर १ लाख रुपये दिले होते.…

Read More

मेष : तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वृषभ : आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. जर तुम्ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं म्हटले आहे. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केले होते. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी सुनावणी घेतली होती. 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुनावणीनंतर न्यायाधीशांनी आपला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मतदार संघाच्या वाढत्या तपामानाप्रमाने रावेर लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापत आहे. राजकारणात नवखे असलेल्या श्रीराम पाटलांनी मुरब्बी खडसे कुटुंबीयांची प्रचारात चांगलीच दम शाक होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्यांना खडसे अगदी खालच्या स्तरावर येऊन बोलत होते त्याच देवेंद्र फडविसांची तातडीची सभा खडसेंना तारण्यासाठी भुसावळ मध्ये घेण्यात आली. एकूणच सभा मोठी दिसावी यासाठी शहरातील मोठे मैदान घेण्याऐवजी एका लहान चौकात सभेचे आयोजन करण्यात आले. त्यातही देवेंद्रजी येईस्तोवर लोकांची जुळवाजुळव करणे सुरू होते. तब्बल वीस हजार लोक येणार अशा वल्गना केल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात मात्र दीड ते दोन हजार लोक आले असे दिसून येते. असो पण देवेंद्र आले ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वसंतवाडी येथे दिनांक ७मे रोजी हळदीच्या कार्यक्रम आयोजित केला होता हळदीच्या कार्यक्रम संपल्यावर गुलाब पवार वय वर्षे ३२ या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुलाब पवार यांच्या पुतणीचा विवाह आज होणार होता या विवाह सोहळ्यात काल संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमात गुलाब पवार हे नाचले आनंद व्यक्त केला मात्र काही वेळेनंतर चौकातुन घरी जात असताना चौकात काहीतरी गोंधळ झाल्याने गुलाब पवार हा घराकडुन परत चौकात आला व त्याठिकाणी येतांच त्याचा तोल जाऊन तो कोसळत असल्याचे येथील चौकात उभे असलेल्या तरुणांनी त्याला हलगत वरती धरलं व त्याला घरी घेऊन गेले काही वेळेनंतर मरण पावल्याचे लक्षात आले त्यानंतर शवच्छेदनसाठी जळगाव जिल्हा…

Read More