Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून सोनसाळखी चोरणारे अटकेत
    क्राईम

    जळगावातून सोनसाळखी चोरणारे अटकेत

    editor deskBy editor deskApril 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सोनसाळखी चोरी करणारे चोरटे हे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया येथे असल्याची माहिती मिळाली. पथक दोन दिवस वेशांतर करुन त्याठिकाणी सापळा रचला. त्यानंतर पाच गुन्ह्यात फरार असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी बुधवार दि. ३ एप्रिल रोजी इराणी वस्तीतून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देला जप्त करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (वय ६०) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाळची दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह माहिती गोळा केली जात होती. दरम्यान, पथकातील पोलीस नाईक विकास सातदिवे, राहुल रगडे, विलाश कोळी हे संशयिताला ताब्यात घेण्यासाठी मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील जुलवानिया येथे गेले. दोन दिवस वेशांतर करुन राहिल्यानंतर अत्यंत शिताफीने पथकाने ईराणी वस्तीतून भुसावळ येथील दोघ संशयितांच्या बुधवार दि. ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुसक्या आवळल्या.

    एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघ संशयितांकडून सुमारे ४० हजार रुपयांची मंगलपोत जप्त करण्यात आली आहे. तसेच या चोरट्यांनी नंदुरबाद जिल्ह्यातील नवापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ असे एकूण पाच गुन्ह्यात हे संशयित फरार असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, मपोकॉ राजश्री बाविस्कर यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.