पाचोरा : प्रतिनिधी बँकेतील बचत खात्यात ठेवलेल्या चार लाखांची ऑनलाइन चोरी झाल्याची तक्रार दुसखेडा (ता. पाचोरा) येथील शेतकऱ्याने सायबर क्राइम शाखेकडे दाखल केली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, अनिल तुकाराम महाजन (दुसखेडा, ता. पाचोरा) यांचे दोन बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यातील रकमेची दि. ३ मे व ४ मे रोजी ऑनलाइन चोरी झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबत सोमवारी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, महाजन यांचे एका बँकेच्या बचत खात्यात २ मेपर्यंत २ लाख ८० हजार एवढी रक्कम होती, तर दुसऱ्या बँकेत २ लाखापेक्षा जास्त रक्कम होती. दि. ४ मे रोजी अनिल महाजन यांच्या बँकेशी जोडलेल्या मोबाइलवर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गुटखा, पानमसाला विक्रीस बंदी असतानाही किराणा दुकानात त्याची विक्री केली जात असताना एमआयडीसी पोलिसांनी तेथून तब्बल एक हजार ३० पानमसाला, तंबाखूचे पाऊच जप्त केले. यासोबतच तंबाखूचे १५ डबे असा एकूण एक लाख ३० हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवार, ५ मे रोजी संतोषी माता चौक परिसरात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजनवर करण्यात आली. या प्रकरणी दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे (४०, रा. रामेश्वर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील संतोषी माता चौकाजवळ असलेल्या दुकानात प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे…
जळगाव : प्रतिनिधी आधीच विवाहित आणि माता असलेल्या महिलांचे अविवाहित तरुणांशी विवाह लावून लाखो रुपयांत फसवणूक करणारी पाच महिलांची टोळी सोमवारी कासोदा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात मोना दादाराव शेंडे (२५), सरस्वती सोनू मगराज (२८, दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६, रा. पांढुर्णा, मध्य – प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील (६०) आणि उषाबाई गोपाल विसपुते (५०, दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) यांचा – समावेश आहे. पाचही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांना हेरून त्यांना मध्यस्थांमार्फत मुली दाखवून लग्नासाठी २ ते ५ लाख रुपये उकळण्याचे त्यांचे उद्योग होते. विशेष म्हणजे, यातील तीन…
मेष कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवणे या आठवड्यात तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. तुम्ही त्यांना कोणत्याही समस्येतून बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे कुटुंबात तुमचा आदर वाढेल. या आठवड्यात, नोकरी व्यवसायाशी संबंधित या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी त्यांच्या कौशल्यांचा पूर्णपणे वापर करू शकणार नाहीत. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात अडचणी येऊ शकतात. वृषभ जपून, विचारपूर्वक वागा. या आठवड्यात, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रात येणारे सर्व अडथळे विसरून सतत पुढे जावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रचंड यश मिळू शकेल. आपले अपयश विसरून आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा. मिथुन आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी…
रावेर : प्रतिनिधी रावेर रेल्वे स्टेशनवर दानपूर-पुणे, महानगरी एक्स्प्रेससह गोवा एक्स्प्रेसला थांबा मिळावा अशी मागणी वर्षानुवर्षापासून रावेर तालुक्यातील प्रवाशांची आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष न दिल्याने प्रवाशांच्या जिव्हळ्याचा हा विषय दहा वर्षातही सुटू शकलेला नाही. कोणताही निधी खर्ची पडत नसतानाही हा प्रश्न लोकप्रतिनिधींना सोडवता आला नाही. वर्षानुवर्षापासूनची रावेर मतदार संघातील रावेर, निंभोरा, सावदा, बोदवड, मलकापूर येथील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रवाशी गाड्यांचा थांब्यांचा प्रश्न भावी काळात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले रावेर लोकसभा मतदार संघात रावेर तालुका हा केळी उत्पादनात अग्रेसर तालुका आहे. यामुळे केळीच्या व्यापारानिमित्ताने येथे परप्रांतातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची…
जळगाव : प्रतिनिधी भाजपाला महाराष्ट्राविषयी इतका द्वेष आहे की, त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग, सेक्टर गुजरातला नेले. आपल्या जळगावमधील पाडळसे धरणाचे पाणी देखील त्यांनी गुजरातला, सुरतला घेऊन गेले. आणि हे पाणी जर का परत जळगावला आणायचं असेल तर आपल्याला यांना यंदा तडीपार करावेच लागेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ रविवार, दि.५ रोजी जळगाव शहरातील जुने जळगाव प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर जोशी पेठेतील बागवान गल्ली येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, ॲड. ललिता…
जळगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील वडजी गावाजवळ भीषण अपघात जखमी झालेल्या खुबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता सतीश साळुंखे (वय ४८, रा. इंद्रप्रस्थ नगर, दूध फेडरेशन रोड) यांचा रविवार दि. ५ मे रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मयत झालेल्या ललिता साळुंखे यांचे पती सतीश साळुंखे हे वर्षभरापूर्वी खुबचंद सागरमल याच शाळेतून सेवानिवृत्त झाले. तर मुलगा बंगळुरू व मुलगी पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ललिता साळुंखे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दि. १ मे रोजी मुलगी संजना हिच्यासह भडगाव येथे कारने जात होते. त्या वेळी वडजी गावाजवळ रस्त्यात अचानक कुत्रा…
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील म्हसावद रस्त्यावर श्रीकृपा जिनिंगजवळ चारचाकी गाडी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (मूळगाव सामनेर, ह. मु, ठाकरे कॉलनी, पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलहून म्हसावदकडे जाणाऱ्या ट्रकला (आरजे १०/ जीबी ८५२८) दुचाकी ओव्हरटेक करत होती. त्याचवेळा समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १९ व्ही १२६७) इरटीका (एमएच १८ बीसी१४०८) ओव्हरटेक करत होती. ही ओव्हरटेक करणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला. यावेळी गणेश पाटील…
जळगाव : प्रतिनिधी वळण घेण्यासाठी थांबलेल्या दोन कारला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दोन्ही कारचे नुकसान झाले असून एक कार तर चक्काचूर झाली आहे. सुदैवाने यातील डॉक्टर बालंबाल बचावले. हा अपघात शुक्रवार, ३ मे रोजी रात्री इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुलीदरम्यान झाला. ४ मे रोजी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेहरूण परिसरात शस्त्रक्रिया असल्याने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे हे कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५७४४) तेथे जात होते. त्यावेळी इच्छादेवी चौकाच्या पुढे असलेल्या वळणावर त्यांच्यापुढे वळण घेण्यासाठी एक कार उभी असल्याने डॉ. नारखेडे हेदेखील त्यामागे थांबले. वळण घेण्यासाठी दोन्ही कारने इंडिकेटर दिलेले असतानाही मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एमएच…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. गुटखाबंदी असतानाही शहरात गुटखा विक्री केली जात आहे. बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी गुप्त माहितीवरून जामनेर रस्त्यावर गुटखा असलेली अॅपेरिक्षा पकडली. यातून ७० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. सट्टा बाजारात आयपीएलवर लाखोंची उलाढाल होत आहे, यावरही पोलिसांची करडी नजर आहे. बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून ७० हजारांचा गुटखा आणि दीड लाख रुपये किमतीची अॅपेरिक्षा, असा सुमारे दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात सर्रासपणे बन्हाणपूर भागातून गुटख्याची वाहतूक होत आहे. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गुटखा माफियांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात बिनदिक्कतपणे पानटपरी, किराणा दुकानांवर सर्रासपणे गुटखा उपलब्ध होत आहे. पोलिस…

