अमळनेर : प्रतिनिधी नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली. या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. निकिता रवींद्र पाटील (वय १९) असे मयत तरुणीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील साने गुरुजी संकुलात प्रसिद्ध असलेल्या रामभाऊ चहावाले (लिबर्टी टी) चे संचालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची कन्या होती. भालेराव नगरात त्यांचे घर असून सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली. अर्ध्या तासाने ही घटना तिच्या…
Author: editor desk
जळगावः प्रतिनिधी मित्रांनो पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला मतदानाचा अधिकार असतांना तुम्ही आमच्या भविष्याचा विचार का केला नाही. या साठी तुम्ही आता पासून सावध व्हा. मोदी सरकारची हुकमशाही राजवट संपुष्टात आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत १३ मे रोजी मोदी सरकारचे तीन तेरा वाजवून ४ जून हा निष्ठावंताचा विजयाचा दिवस रहिल यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले. पुढे बोलतांना त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींवर देखील टीकास्त्र…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा-यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोलपंपाच्या जवळपास यावलकडून येणाऱ्या कारने चोपडा येथून अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रतन ऊर्फ नितीन रमेश पाटील (३८) व चेतन निंबा पाटील (२५, दोन्ही रा. पारगाव) अशी मयत तरुणांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास चोपडा-यावल रस्त्यावर भरधाव कारने (एमएच ०४ जेएम ३३८८) दुचाकीवरील (एमएच १९ एएम ५४८१) दोघांना धडक दिली. अपघातात पारगाव येथील रतन पाटील व चेतन पाटील हे दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दोघांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना अधिक उपचारासाठी जळगावला पाठवण्यात आले. जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड गावातून बचतगटाची वसूल केलेली दोन लाख ३२ हजाराची रक्कम घेऊन बँकेचे वसुली अधिकारी चालले असता चोरट्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. वराड गावातून बचतगटाची रक्कम वसूल करून वसुली अधिकारी पवन राजू मारग (बारव पिंपळगाव ह.मु देवकर नगर, जळगाव) हे जळगावकडे निघाले होते. गावाबाहेरील शाळेजवळ तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी धक्का देऊन त्यांना खाली पाडले. दगडांनी मारून गाडीला लावलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. या बॅगेत बचत गटाचे २ लाख ३२ हजार रुपये होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी धाव घेऊन शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. मारग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात, आईसह दोन मुलं ठार झाले; तर, मयत महिलेचा १२ वर्षीय भाचा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी जमावाने वाहनांवर दगडफेक केली. यावेळी घटनेत एक पोलिसाला किरकोळ दुखापत झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलगा सोमेश (वय २) व सोहम (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) अशी मयतांची नावे आहेत. वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या. यात त्यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय…
जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.५ रोजी आसोदा, भादली आणि ममुराबाद येथे प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे मत ‘मशाल’लाच राहील, अशा विश्वास दिला. करणदादा पाटील यांचे गाव-गावात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी औक्षण करून आशीर्वाद दिले. रॅलीदरम्यान, करणदादा पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील यांच्या घरी भेट दिली. आसोदाचे सरपंच सागर कोळी यांच्या घरी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून तर डॉ. रमाकांत कदम यांच्या घरी डोक्याला फेटा बांधून, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रॅलीत…
मेष : आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे. वृषभ : आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण…
कर्नाटक : वृत्तसंस्था कर्नाटकातील जिल्ह्य़ातील दांडेली तालुक्यात एका 32 वर्षीय महिलेने तिच्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या 6 वर्षाच्या दिव्यांग मुलाला मगरीने बाधित नदीत फेकून दिले होते. एका दिवसानंतर मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ते म्हणाले की, या जोडप्यामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाच्या अपंगत्वावरून अनेकदा भांडण होत असे, जो जन्मापासून मूक होता. दोघांनाही एक लहान मुलगा असून त्याचे वय 2 वर्षे आहे. लोकांच्या घरी मदत म्हणून काम करणारी सावित्री, तिचा 36 वर्षीय पती रवी कुमार यांच्याशी त्यांचा मोठा मुलगा विनोद याच्या मूकपणामुळे आणि ऐकू न येण्यावरून नेहमीच भांडत असे. सावित्रीने पोलिसांना सांगितले की तीचा नवरा नेहमीच तिची…
जळगाव : प्रतिनिधी अंगणात उभ्या केलेल्या एका ईलेक्ट्रीक दुचाकीसह दोन दुचाकींना आग लागून त्या जळून खाक झाल्या. ही घटना रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव म्हसावद येथील योगेश रमेशचंद अग्रवाल (वय ४९) यांचा हलवाईचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांची (एमएच १९, डीझेड, ३६४६) इलेक्ट्रीक बाईक व दुसरी (एमएच १९, डीयू ९८३४) क्रमांकाची दुचाकी अंगणात उभी केली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या दुचाकींनी आग लागून दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री दोन वाजता एका जणाने अग्रवाल यांना आवाज देऊन दुचाकी जळत असल्याची माहिती दिली. त्या वेळी…
रावेर : प्रतिनिधी पिकवलेल्या केळीला भाव न मिळाल्याने कर्जाच्या चिंतेत असलेल्या हर्षल रविंद्र नेहेते (वय ३८, रा. निंभोरा, ता. रावेर) या तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील तरुण शेतकरी हर्षल नेहेते यांनी उत्पादन चांगले व्हावे व त्याचा मोबदला चांगला मिळावा. यासाठी शेतात केळीची लागवड केली होती. परंतु केळीला भाव न मिळाल्यामुळे तसेच त्यासाठी लागलेला खर्च देखील न निघाल्याने ते निराश होते. तसेच आर्थीक विवंचनेत असलेल्या नेहते यांना डोक्यावरील कर्जाची…

