जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालत तिचा हात पकडून विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बुधवार दि. ५ जून रोजी मध्यरात्री तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सन २०२१ पासून गावात राहणारा निलेश हिरामण मराठे हा पिडीत मुलीला लग्नाची मागणी केली. त्यावर पिडीत मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने मुलीचा हात पकडून विनयभंग केला. ही घटना दि. ११ एप्रिल २०२४ रोजी घडली. त्यानंतर पिडीत तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी खोट्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिलेले दागिने तारण ठेवून त्यावर २ लाख लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु ते दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सोने तारण ठेवणाऱ्यांना फायनान्स कंपनीने त्याच दागिन्यांवर जास्तीचे कर्ज देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत रंगेहाथ पकडले. ही घटना गुरुवार दि. ६ जून रोजी सकाळी अकरा वाजता मनप्पूरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीपेठेतील मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीत हर्षल रविंद्र पेटकर (रा. दिग्रस, जि. यवतमाळ) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या कार्यालयात तेजस देविदास ठाकूर (रा. शाहूनगर) हा तरुण क्लर्क असून…
जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढोरे जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदावर रिक्त असलेल्या जागेवर सांगली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्ञानेश्वर ढेरे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारावा तसा अहवाल शासनास पाठवावा असे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छाप वाले यांनी सहा जून रोजी काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १९मार्च रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात डॉ. विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाकडून पाच वेळा तारखा मिळाल्यानंतर विद्या गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे राज्यशासनाच्या…
जळगाव : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंप्राळा येथील मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर (वय ४७, रा. पिंप्राळा) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा येथील तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात दि. १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर दि. २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी…
जळगाव : प्रतिनिधी रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अमळनेर येथील भावा- बहिणीचा वोल्खोव्ह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली. रशियात बुडून मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील तरुणांची संख्या आता तीन झाली आहे. जिया फिरोज पिंजारी (२०) व जिशान अशफाक पिंजारी (२०, दोन्ही रा. अमळनेर), अशी या भावा बहिणीची नावे आहेत. याच घटनेत मंगळवारी भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले (१९) याचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ते भोजन करण्यासाठी बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, व्होल्का नदीकाठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला. तेथे जिया ही नदीपात्रात उतरली. त्याबाबत जिशानने व्हिडिओ कॉल केला होता. अशफाक व त्यांच्या परिवाराने जियाला पटकन पाण्यातून बाहेर काढ,…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्वात आणि स्वभावातील सकारात्मक बदलांमुळे तुमचे कुटुंबीय आनंदी राहतील. यापूर्वी केलेल्या कोणत्याही सामाजिक कार्यासाठी तुमचा सन्मान होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या आगमनामुळे घरात धांदल उडेल. आज तुमच्या योजना आणि उपक्रम गुप्त ठेवा. आज व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या दूर होईल. आज अनुभवी लोकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वृषभ राशी तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्याबद्दलची कोणतीही खास गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. आज तुमच्या आईच्या सल्ल्याने घेतलेला कोणताही निर्णय भविष्यात फायद्याचा ठरेल. विद्यार्थी आज संगणक अभ्यासक्रम शिकण्याचा निर्णय घेतील. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे…
सातारा : वृत्तसंस्था सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच घेताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालक डॉ.सपना सुखदेव घोळवे (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे दरम्यान, याच प्रकरणात येथील समाजकल्याण निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी…
जळगाव : प्रतिनिधी देशातील सर्वच पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देवून संधी दिली होती यातील चार उमेदवार कॉंग्रेस पक्षाकडून रिंगणात होत्या. मात्र या १७ महिलांपैकी केवळ सात महिलांना विजयी होऊन आता लोकसभेची दारे खुली झाली आहेत. विजयी उमेदवारांमध्ये सगळ्यात प्रमुख नाव आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांचे बंधु अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले. सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पवार कुटुंबातील दोन सदस्य प्रथमच परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले होते. भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ आणि रक्षा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तराखंडच्या देहराडून या शहरातून समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर नवरा त्याच्या मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, सकाळी तो उठलाच नाही. मैत्रिणीने पाहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मैत्रिणीने त्याची पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला असून, चौकशीची मागणी केली जात आहे. युवकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अझीम (वय ३०) हा मैत्रिणीच्या घरी झोपायला गेला होता. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील जनता उकाड्याने हैराण झाली होती पण आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आज 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झालं आहे. हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले. हवामान विभागाने 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र आता तो वेळेआधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे,…

