मुंबई : वृत्तसंस्था तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई-बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक तरुणांना केले. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक राहा, अशा शब्दांत त्यांनी संयम राखण्याची विनंती केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यालाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावांत चुली न पेटवता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या घटना कानावर…
Author: editor desk
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या भाविकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल व पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशाराही शाह यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. शिव खेरी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ५३ जणांसह ही बस कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात…
यावल : प्रतिनिधी शहरात नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे जानकीराम शिवदास भिल (वय ३५) हा तरुण काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. ९ जून रोजी सकाळी यावल शेतशिवारात किरण चिंधू बोरोले यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी शेतात जाऊन पाहिले तर जानकीराम भिल याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी सहायक फौजदार विजय पासपोळ, हवालदार उमेश सानप, वसीम तडवी, मोहन तायडे हे दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना आणून विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विश्वनाथ भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद…
भुसावळ : प्रतिनिधी दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी विष्णू पथरोड (वाल्मीक नगर, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील पोखरणी (जि. हरदा) येथून अटक केल्याने आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. अटकेतील विष्णू पथरोडला शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर बुधवारी २९ मे रोजी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कारमधून जात असलेले माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी विनोद चावरिया, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, किरण कोळी व करण पथरोडला यांना अटक केली आहे. चारही…
जळगाव : प्रतिनिधी पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जॉधनखेडा येथील रोहिदास राठोड याने राहुल लवंग चव्हाण (रा. लालगोटा, ता. मुक्ताईनगर) याच्या पत्नीस पळवून नेले होते. त्याचा राग राहुल याच्या मनात होता. शनिवारी दि. ८ रोजी रोहिदास हा राहुल चव्हाण याला दिसला. तेव्हा त्याने रोहिदास याला पकडून हलखेडा येथील नरलाल पवार याच्या घरासमोर ओढत नेले आणि त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रोहिदास राठोड हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली.…
मेष राशी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जमिनीशी संबंधित कोणतेही मोठे प्रकरण सोडवले जाईल. कार्यालयात नवीन उपक्रम घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज करिअरमध्ये काही बदल होणार आहेत, प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जोडीदारासोबत डिनरला जाल. वृषभ राशी आजचा दिवस नवीन बदल घडवून आणणार आहे. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्हाला अचानक धनलाभ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. आज तुमचे आरोग्य तंदुरुस्त असणार आहे. या राशीच्या महिलांना आज त्यांच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळू शकते, जे…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याप्रकरणात मध्यप्रदेशातील छनेरा गावामधून विष्णू पथरोड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याला भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुहेरी हत्याकांडप्रकरणी आता अटकेत असलेल्या संशयित आरोपींची संख्या ५ वर पोहोचली आहे. यापूर्वी राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया, करण पथरोड, गोपाल कोळी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान छनेरा गावात विष्णू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन विष्णुपथ रोड याच्यासह त्याच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी अंती दोन्ही नातेवाईकांना सोडून देण्यात आले आहे. तर विष्णू पथरोड…
मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण देशाला राज्यातील निकालाने मोठा धक्का दिला असून आता महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. पक्ष…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले आहेत. त्यात एनडीएचे सर्व 293 खासदार, राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. सविस्तर वृत्त असे कि, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपल्यानंतर आघाडीचे नेते आजच सरकार स्थापनेचा…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या तयारीत असून त्यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषणाला परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. त्यानंतर आता आणखी दोन गावातील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. मात्र आता त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंतरवाली सराटीनंतर आता वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध…

