जळगाव : प्रतिनिधी रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या लोकसभेच्या निवडणुकीत तिसर्यांदा खासदार होवून विजयी झाल्या आहेत. खासदार खडसे यांना सहा लाख तीन 30 हजार 879 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी श्रीराम पाटील यांना तीन लाख 58 हजार 696 मते मिळाली. दोन लाख 72 हजार 182 मतांनी खासदार खडसे यांचा विजय झाला आहे. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार खडसे यांना सहा लाख 55 हजार 386 मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी उल्हास पाटील यांना तीन लाख 18 हजार 740 मते मिळाली होती. त्यावेळी खासदार खडसे यांनी डॉ.पाटील यांचा तीन लाख 35 हजार 882 मतांनी पराभव केला होता. जळगावसह रावेरात मिळालेल्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसून मी त्याची जबाबदारी स्वीकारत असून उपमुख्यमंत्री पद सोडण्यास तयार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. दि. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला आहे. भाजपाला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले असून या अपयशाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जळगाव : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर ओळख झालेल्या छत्तीगढ येथील परप्रांतीयाने भुसावळातील तरुणासोबत कुसुंबा येथे भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंग सेंटर सुरु केले. केवळ चार ते पाच दिवसात या तरुणाने पैशांसाठी आपल्या भागीदारासह गेम खेळण्यासाठी येणाऱ्या अन्य दोघांच्या अपहरणाचा कट रचला. त्यानंतर छत्तीसगढ येथील साथीदारांच्या मदतीने जळगावातून तिघांचे अपहरण करीत त्यांना छत्तीसगढमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले. तरुणांच्या सुटकेसाठी २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या परप्रांतीय अपहरणकर्त्यांच्या टोळीच्या एमआयडीसी पालिसांनी पर्दाफाश करीत छत्तीसगढ येथून चौघांच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील विशाल अनिल शुबवानी याची रेल्वे स्थानकावर छत्तीसगढ येथील एका जणासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी जळगावातील कुसुंबा येथील सीटी सेंटर याठिकाणी भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय सुरु…
मेष राशी – तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. घरातील वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल. आज जे काही काम सुरू कराल ते यशस्वी होईल. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या सूचना देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या वागण्याने वडील खुश होतील, लोक तुमची प्रशंसा करतील. आज वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ राशी – आज तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल. तुमच्या वागण्याने लोक खूश होतील. तुम्ही एखाद्या मोठ्या व्यावसायिक गटात सामील होण्याचा विचार कराल. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. कलेशी संबंधित लोकांचा समाजात सन्मान वाढेल, लोक तुमच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक चांगलीच चुरशीची झाली होती. त्यानंतर आज ४ जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू आहे. दोन्ही जागांवर सुरूवातीपासून भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. जळगाव मतदारसंघाची मतमोजणी पूर्णत्वाकडे आली असून त्यानुसार भाजपाच्या स्मिता वाघ या विजयी झाल्या आहेत तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे या विजयी झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. मात्र अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. जळगावसह रावेरात मिळालेल्या यशानंतर जळगावातील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात बेभान होवून नृत्याला सुरूवात केली आहे. दोन्ही जागांवर यशाचे शिलेदार हे मंत्री गिरीश महाजन…
जळगाव : प्रतिनिधी रावेर लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांची विजयी घौडदोड सुरु आहे. तब्बल तीन लाख 88 हजाराचा लीड त्यांनी घेतला आहे.सुरुवातीला रक्षा खडसेंना तिकीट मिळणार की नाही अगदी इतपासून शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र भाजपने रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी दिली. त्यानंतर मतदारसंघात अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी बदलली जावू शकते असेही बोलले जात होते मात्र, रक्षा खडसे यांचे तिकीट बदलले गेले नाही. पंधराव्या फेरी अखेरीस तीन लाख 88 हजार 919 मतांचा लीड घेऊन रक्षा खडसे यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची विजयाची घौडदोड कायम ठेवलेली आहे. पंधराव्या फेरीपर्यंत खडसे यांना 4,15, 432 अशी मते मिळाली असून महाविकास…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्यात आली असून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु असतांना रावेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप सोडून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांनी सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रार करूनही दखल घेत नसल्याने उमेदवार आक्रमक झाले असून त्यांनी मतमोजणी देखील बंद पाडल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील टेबल नंबर 11 आणि टेबल नंबर 13 यांची व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची केली मागणी असून इव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग कमी कशी काय झाली. इतके दिवस चार्जिंग का कमी झाली नाही. मतदान झाले होते तर…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निकालात आज सकाळपासून रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळत असून जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांसह नेत्यांनी मोठी गर्दी केली असून जल्लोष देखील सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकदा भाजपचा बोलबाला पहायला मिळत आहे. १३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 70,525 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,61,334 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसत असल्याचे चित्र समोर येत असतांना पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली. परंतु तो प्रयोग यशस्वी होत नसल्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची साथ धरली आणि लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. परंतु या रिंगणात पुणेकरांची पसंत वसंत मोरे ठरु शकले नाही. पुणेकरांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाच साथ दिल्याचे सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कलावरुन दिसूत येत आहे. वसंत मोरे…
जळगाव : प्रतिनिधी देशात लोकसभा मतमोजणीची धामधूम सुरु असून आज सकाळपासून लोकसभा निवडणूकीच्या निकालात रावेर आणि जळगाव लोकसभेतून महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आल्याचे पहायला मिळाले. सकाळी ११ वाजता चौथ्या फेरती रक्षा खडसे ह्या ७४ हजार ९१२ मतांनी तर स्मिताताई वाघ ह्या ७१ हजार ८९३ मतांनी आघाडीवर पुढे असल्याचे दिसून आले. १३ मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यात लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर एक्झीट पोलचा निकाला महायुतीच्या बाजूने असल्याचे कल दिसून आला. दरम्यान आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीच्या निकाल जाहीर टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे. आता सकाळी ११ वाजता चौथ्या फेरीत मिळालेल्या माहितीनुसार रक्षा खडसे 74,912 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 1,71,587 इतके मत…

