Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी पत्नी माहेरी गेलेली घरी एकट्याच असलेल्या मनोज गजानन साकरे (वय ३०, रा. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शेजारील मंडळींना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला त्या वेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारा मनोज साकरे हा तरुण मजुरी काम करुन उदनिर्वाह करीत होता. त्याची पत्नी माहेरी गेलेली असल्याने मनोज साकरे हा घरी एकटाच होता. रविवार दि. ९ मे रोजी सकाळी मनोज याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्या वेळी शेजारील काही जणांना ते गळफास घेतल्याचे दरवाजातून दिसले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगत फोन पेची संपूर्ण माहिती घेऊन डॉ. सुजाता प्रमोद महाजन (६२, रा. गांधीनगर, जिल्हापेठ) या महिला डॉक्टरांची एक लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना २१ मे रोजी घडली. याप्रकरणी सोमवार, १० जून रोजी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुजाता महाजन यांना दि. २० मे रोजी अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना सैन्य दलातील अधिकारी बोलत असून तुमच्याकडे जवानांची तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले. डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरुन कार्ड पाठवले. दुसऱ्या दिवशी महिला डॉक्टरच्या पतीशी समोरील व्यक्ती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाडेतत्त्वावर ठरवलेली रिक्षा रद्द केल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने संजय पुनीलाल ठाकूर (४८, रा. मोहननगर) या शिक्षकास मारहाण केली. यामध्ये लाकडी फळी, वीट डोक्यात मारल्याने शिक्षकाला दुखापत झाली असून त्यांची सोन्याची चेन व चष्मा तोडला. ही घटना रेल्वेस्थानकानजीक रिक्षा थांब्यावर रविवार, ९ जून रोजी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संजय ठाकूर यांच्या काकांचे सोमवार, १० जून रोजी उत्तरकार्य असल्याने रविवारी रात्री ठाकूर यांच्या बहीण व मेहुणे हे रेल्वेने जळगावात आले. त्यांना घेण्यासाठी ठाकूर रेल्वेस्थानकावर गेले होते. तेथे रिक्षा शोधत असताना एक रिक्षा (एमएच १९ व्ही ९४७३) ठरविली. मात्र, बहीण व मेहुणेही रिक्षा पाहत असल्याने ठरविलेली रिक्षा रद्द केली. त्यातून…

Read More

रावेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील भांडणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले पती पत्नी पोलिसांच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशात जात होते. मात्र, त्या दरम्यान दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. त्यात पतीचा मृतदेह निंभोरासीम शिवारात, तर पत्नीचा मृतदेह रसलपूर शिवारात आढळून आल्याने दोघांच्याही मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, पत्नीचा मृतदेह पाल रस्त्यावर सोमवारी सकाळी आढळून आला. तर तिच्या पतीचा मृतदेह निंभोरासीम येथे झाडाला उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पतीचे नाव सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४) तर पत्नीचे नाव प्यारीबाई (वय ४२) रा. बेलखेडा, जि. खरगोन असे आहे. या दोघांचाही मृत्यू दोन दिवस आधी झाल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदनात…

Read More

मेष राशी आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्षेत्रात प्रियजनांची साथ मिळेल. व्यापारात प्रगती होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशी जाण्याचा योग आहे. तुमच्या व्यक्तीगत समस्या तात्काळ सोडवा. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. नोकरदारांना आजचा दिवस चांगला जाईल. आज खरेदीत अधिक खर्च होईल. वृषभ राशी आज संतान सुख मिळेल. जुन्या मित्रांकडून शुभ समाचार ऐकायला मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याला. आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते. नोकरीतील आजचा दिवस चांगला जाईल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. तंत्रज्ञानाशी संबंधिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज नवा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापारात नवीन साथीदार मिळतील. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. पण काहीशी किरकीरही जाणवेल.…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंचविसावा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा समता व संविधानाच्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आणि सर्व जाती धर्माला…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे गावात मताधिक्य नसल्याच्या बातम्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या आहेत. मात्र सदर बातम्या ह्या खोट्या आकडेवारी वर आधारित व दिशाभूल करणाऱ्या आहेत. जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या गावनिहाय असलेले बुथ क्रमांक व बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारी वरून आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे या दोन्ही गावातील तिन्ही बूथ वर भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना 573 मतांचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसऱ्याच गावाच्या बूथ केंद्राची माहिती हे आमदारांच्या गावाची असल्याचा भासविण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रांनी केला आहे. विशेष…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था बालपणापासून सोबत असलेल्या नाशिकरोड येथील दोन मित्रांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नाशिकरोड येथील गिते मळा परिसरात राहणारा सचिन करवर आणि म्हसोबा मंदिरामागील संकेत राठोड हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते. नुकतीच त्यांनी १२ वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सविस्तर वृत्त असे कि, सचिनचे वडील मालधक्क्यावर तर, संकेतचे वडील मिस्त्री काम करुन घरचा उदरनिर्वाह करत आहेत. दोन्ही मित्रांनी शनिवारी रात्री रेल्वेच्या वालदेवी नदीपुलावरील एका खांबाजवळ उभे राहून मुंबईवरून नाशिकरोडकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी आपल्या भ्रमणध्वनीवर भावपूर्ण श्रध्दांजली असा संदेश टाकला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून लोहमार्ग…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी ३.० सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोढरे येथील प्रेमी युगूलाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर मध्यरात्री मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसखाली उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. गंभीर जखमी तरुणावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तरुणीच्या मृत्यू प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव रेल्वे स्थानकावर डाऊन प्लॉट क्रमांक 2 वर शुक्रवार, 7 रोजी रात्री…

Read More